जागतिक तापमान वाढीसाठी जबाबदार कोण?
‘जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह म्हणजे आपली पृथ्वी’. लाखो वर्षांपूर्वी या ग्रहावर जीवसृष्टीतला पहिला जीव पाण्यात तयार झाला. त्यानंतर कित्येक हजार वर्षांनी मानवाची उत्पत्ती झाली. पृथ्वीवर एकूण ७१ %पाणी आणि 29 %जमीन आहे .त्यापैकी बरेचसे पाणी महासागर सागर सरोवर आणि हिमस्वरूपात आहे. या पाण्याव्यतिरिक्त पिण्या योग्य पाणी फक्त दोन टक्के. याच पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी, सांडपाणी म्हणून आणि शेतीसाठी वापर करतो. पाण्याचा जपून वापर करणे पाणी वाया न घालवणे त्याचा थेंब थेंब वापरतात आणणे आणि पावसाच्या स्वरूपात पडणारे पाणी अडवून जमिनीत जिरवायला मदत करणे आपले आद्य कर्तव्य. पण इतका पाणी प्रश्न महत्त्वाचा असूनही दरवर्षी पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जाते. हा जागतिक वातावरण बदलाचा परिणाम म्हणावे लागेल.
वातावरण बदलाचा फटका केवळ जल संकटापुरताच मर्यादित नाही तर त्यामुळे प्रचंड उष्णता, पाण्याचे बाष्पीभवन ,बर्फ वितळणे, वातावरणात दूषित हवा धूर उष्णता याचे साम्राज्य या सर्वांचा परिणाम म्हणून नवनवीन आजार आणि घटत जाणारे पर्जन्यमान पुढे येत आहे.जगभरातील टॉप तीन देशांमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहणार आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्याने पाहत नाही. रस्ते पुनर्बांधणी ,किंवा रस्ते रुंदीकरणात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा असलेले झाडे सर्रास तोडून टाकले जातात. त्या जागी नव्याने नावाला वृक्षारोपण होते पण त्याचं जतन संवर्धन करणे कटाक्षाने केलं जात नाही. म्हणूनच झाडांची संख्या अतोनात कमी होत चालली आहे.
देशाच्या विकासाच्या नावावर माळरान जमिनी साफ करून तिथे रस्ते बनवले जात आहेत. डोंगर माळ ही निसर्गाची अनमोल देन. त्याचा कसा व किती कशासाठी वापर करायचा हे जरी आपल्या हातात असले तरी पर्यावरण रक्षणात याचे योगदान लक्षात घ्यायला हवं. ह्या माळराण जमिनीचा वापर झाडे लावून तिथं वनराई करण्याकडे केला पाहिजे. शेती योग्य जमीनी लागवडी खालचे होत्या त्यांचा वापर घरे बांधण्यासाठी केला जातो. मानवी निवारे व वस्त्या साठी जंगल झाडी तोडून तिथे सपाटीकरण करून इमारती उभ्या केल्या जात आहेत. लोकसंख्या वाढीमुळे वरचेवर टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. अन्नधान्य निर्मिती करणारे क्षेत्र कमी होत चालले आहे.
जवळपास 20 वर्षापासून जागतिक तापमान वाढ व त्यामुळे होत असलेले ऋतू बदल यांचे छोटे मोठे परिणाम दिसून येत आहेत परंतु आता गेले पाच वर्षात याची तीव्रता आणि परिणाम खूप वाढत चाललेले आहेत.2023मध्ये देशातील नऊ शहरांचे तापमान 45 डिग्री च्या वर गेले होते., वृक्षतोडीमुळे कारखाने वाहने यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे. पाण्याचा सिंचनाच्या अतोनात वाढत्या अति वापरामुळे. समस्त मानव जात व पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे . ज्या ठिकाणी मधवर्ती उद्याने शाळा कार्यालये दावाखाने आहेत, त्या ठिकाणी छतावरून पडणारे पाणी जमिनीत मुरण्यासाठी शासकीय सेवेचा भाग म्हणून कायम स्वरुपी rain harvesting च्या योजना राबवून घ्याव्यात. अजूनही वेळ गेलेली नाही.जीवसृष्टीला टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. ही पुन्हा धरा पुन्हा नव्याने हिरवीगार करूया.
अनुराधा भुरे,नांदेड