0
1
8
2
9
9
अबब! भंडा-यातील दिघोरी (मोठी) येथे आढळले ५० साप
संजय मेश्राम, भंडारा प्रतिनिधी
दिघोरी (मोठी): येथील रहिवासी असलेले गजानन निनावे त्यांच्या राहत्या घराशेजारील असलेल्या सांदवाडीमध्ये गुरुवार दि. २० जून रोजी दुपारी २ वाजता दरम्यान १ मोठा व ४९ लहान, असे एकूण ५० साप आढळून आले व निवाने परिवारात एकच खळबळ उडाली. सदर माहिती सर्पमित्र रोहित फूलबांधे यांना देण्यात आली.
तात्काळ सर्पमित्र यांनी घटनास्थळी पोहचून सर्व साप मोठ्या शिताफिने पकडून वनविभागाच्या स्वाधीन करून जंगलात सोडून जीवनदान देण्यात आले. यावेळी संदीप निनावे, शेसरावं रोकडे, राजेश शेंडे, अमोल मखरे, दिनेश मटाले, ब्रह्मानंद कोवे व नागरिक उपस्थित होते.यावेळी सर्प मित्रानी एकच आव्हान केलं की कुठे अशी परिस्थिती असेल तर त्यांना कळवावे आणि सर्व परिसर स्वच्छ ठेवावे म्हणजे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही.
0
1
8
2
9
9