Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनखानदेशचारोळीछत्रपती संभाजी नगरदादरा नगर हवेलीदेश-विदेशनाशिकपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“गालावर अभिषेक करणारा ‘पापणकाठ’ देतोच ना दगा ऐनवेळी”; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 3 3 5 2 0

“गालावर अभिषेक करणारा ‘पापणकाठ’ देतोच ना दगा ऐनवेळी”; सविता पाटील ठाकरे

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण

रिना.. माझी जीवश्य, कंठस्थ मैत्रीण. तशी ती माझ्याकडे कधीतरीच येते. आज अचानक आली तेही न कळवता. उसने हास्य आणून माझ्या मनाला जपण्याचा तिचा प्रयत्न मी कधीच ओळखून घेतला. वरवर दुःख दाखवत नसली तरी, तिचा चेहरा वाचण्याचं कसब मी लहानपणीच शिकली होती. तीचं दुःख मला सांगायची गरजच नसायची. तिच्या सासूचं तिला नेहमी टोचून बोलणं. नवऱ्याचं सदा दुर्लक्ष करणं, तिला मूलबाळ नसल्याने समाजासाठी आणि घरच्यांसाठी ती निपुत्रिक होती. समाज तिला वांझ म्हणून संबोधत होता. दुपारी जेवतांना तिचा ‘पापणकाठ’ तहान लागल्यागत पाणी पितांना मी पाहिला.

सहजच तिचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून मी टीव्ही सुरू केला. लातूरची एक बातमी होती. दोन…तीन वर्षापासून वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजींचं वृद्धापकाळाने निधन झाल्याची. त्या आजींना आठ मुली होत्या पण समोरून अंत्ययात्रा गेली; तरी त्यातली एकही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे आली नाही. सर्व बहिणींनी आईची संपत्ती हडप केली. आपसात वाद घातलेत….रक्ताचे नाते विसरले. शेवटी आईच्या दुधाचे सुद्धा उपकार ठेवले नाहीत. आठ मुली, जावई, नातू, सख्खा भाऊ असून सुद्धा आजींचा हा दुर्दैवी शेवट मी आणि रीना ओलावलेल्या पापणकाठनी गंभीरतेने पाहत होतो. पुन्हा एकदा तिचा आणि माझाही पापणकाठ ओलावला. यावेळी मात्र त्यांनी आमच्या गालावर अभिषेकच केला.

पापणकाठ….अर्थात डोळ्यात आलेले अश्रू…दुःख असो की आनंद मन जरी टिपत असलं, तरी त्याचे प्रदर्शन करण्याची जबाबदारी डोळ्यांवर आलेली असते. एकुलत्या एक मुलीच्या लग्नात सासरी जातांना तिची पाठवणी करतांना बापाच्या खांद्यावर जेव्हा ती डोकं ठेवते, ती रडते मात्र बापास आपल्या पापणकाठाला खूप खूप जपावे लागते. वीर सैनिक पत्नीकडून औक्षण करून जेव्हा सीमेवर निघतो तेव्हा त्याची पत्नी धीरानं स्वतःला सांभाळते.पण.. पण ‘पापणकाठ’ देतोच ना दगा ऐनवेळी. तसा तो खंबीर…पण तिने ऐनवेळी धोका दिला त्याला प्रेमात..आणाभाका सारं काही ती विसरले. आज तिचं लग्न आहे.. त्याच्या खिशातला हात रुमाल भिजत आहे पापणकाठ पुसून…!

तमाम मराठी रसिक मंडळी…आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘पापणकाठ’ हा आगळावेगळा विषय दिला तसं पाहता विषय सोपा नव्हता. तरीही सर्वांनी आपापल्या परीने विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेकावीध रचनांनी सर्वच समूह बहरलेत. परीक्षणाच्या निमित्ताने सर्व रचना वाचताना काही भावस्पर्शी कवितांनी माझाही पापणकाठ ओलावला. सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन..

सर्वांसाठी एक नम्रतेचे निवेदन.आगामी ७ मे २०२५ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे ‘गौरव अभिजात २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात काव्यवाचन स्पर्धा मुख्य आकर्षण असून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवींची उपस्थिती अपेक्षित आहे. तेव्हा तुम्हाला सर्वांना नम्र निवेदन आहे की …कृपया काव्यवाचन स्पर्धेत व या ठिकाणी प्रकाशित होणाऱ्या जवळपास २० काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपली उपस्थिती निश्चितपणे असावी या माफक अपेक्षेसह तुर्तास थांबते. आपण सर्वांना पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा..!!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री,लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 3 5 2 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
08:05