‘दुबार सन्मानाची पुरस्कर्ती अर्पिते शब्दपुष्पे कृतज्ञतेची…!; राजश्री ढाकणे
‘दुबार सन्मानाची पुरस्कर्ती अर्पिते शब्दपुष्पे कृतज्ञतेची…!; राजश्री ढाकणे
” लेखणीचा सन्मान डबल
प्रत्येक गोष्ट दिसे वेगळी
आनंदाचे वारे तनामनात
सप्तरंग लेई काया सगळी..!”
आनंदाचा डबल धमाका ..आजचा दिवस. आनंददायी… प्रेरणादायी…आश्चर्यदायी… सन्मानदायी…अभिनंदनदायी.. असाच आहे…हायकू आणि कविता समूहात पाऊल टाकताच “शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेत आणि शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेत “दोन्हीही सर्वोत्कृष्ट पंगतीत रचना विराजित पाहून क्षणभर काळजातले दुःखही आनंदात न्हाऊन निघाले…!..अभिनंदनीय शुभेच्छांच्या पुष्पवर्षावात चिंब चिंब भिजले. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या.
जबाबदारीचे एक काम पूर्ण केल्याचा आनंद आणि चिमुकल्यांचा आनंद हृदयात कायमचा साठवला…! हायकू काव्य समूहात पाऊल टाकताच चित्र पाहिले आणि विषयाला अनुसरून लेखणीने धाव घेत एकूण २७ हायकू रचना केल्या…!!!.. अर्थात आपल्या सर्वांच्या प्रेरणादायी प्रतिक्रिया आणि शुभेच्छामुळे …!.कालरात्री कविता समूहात डोकावले आणि विषय बघितला” फारकत” पुजा करायची थांबवून हा सामाजिक विषय हाताळण्यासाठी आधी कविता लिहिली आणि मग पुजा केली… आणि… आणि… काय आश्चर्य…!!!.. सर्व सन्माननीय परीक्षकांनी माझ्या “फारकत ” रचनेला ५ वे. स्थान देवून सन्मानित केले…!… एकदाच आनंदाचा डबल धमाका म्हणजे माझ्यासाठी अगदी दुःखावर फुंकर…अविस्मणीय रविवार…!!!.. ज्यांच्या अहोरात्र… अथक परिश्रमातून मला मिळाला हा आनंद… सन्मान… मिळाला आहे त्या सर्वांच्या कार्याला प्रथमतः मी ऋणयुक्त वंदन करते.
मराठीचे शिलेदार परिवाराचे प्रमुख, मुख्य प्रशासक…संपादक…नानाविध स्पर्धेचे आयोजक, ध्येयवेडे देवांशआदरणीय श्री राहुलदादा पाटील त्यांची खरी ताकद ..सावली…त्यांच्या अर्धांगिनी तथा संस्थेच्या सचिव सौ.पल्लवीताई पाटील… हायकू काव्याचे मुख्य परीक्षक आदरणीय हंसराज दादा, आदरणीय विष्णूदादा, काव्य समूहाच्या मुख्य परीक्षक सौ. सविता पाटील ठाकरे, सौ. वैशालीताई अंड्रसकर, सुधाताई, स्वातीताई, वृंदाताई, तारकाताई, प्रतिमाताई, संग्रामदादा, अरविंद दादा, विकास दादा….सर्व सन्माननीय सहप्रशासक.. परीक्षक… संकलक.. अगदी सर्व शिलेदार परिवाराच्या ऋणात राहून मी धन्यवाद व्यक्त करते…!
असं म्हणतात सुख किंवा आनंद हा आपल्या मानण्यावर असतो…अगदी खरं आहे बरं का हे… काहींना कशातच आनंद वाटत नाही…अगदी सर्व सुखे त्यांच्या पायाशी लोळत असली तरीदेखील…यांच्या चेहऱ्यावरील बाराचा काटा काही ढळत नाही …पण खरं सांगू का, आनंद हा अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण दडलेला असतो…आणि त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे…आपणच ठरवायचं कसं जगायचं ते रडत रडत की,गाणे म्हणत…!…कितीही वय झालं तरी मन मात्र लहान बालकाप्रमाणे आनंदी असायला हवं…तेव्हाच आनंद देताही येतो आणि घेताही येतो असं मला वाटतं…घरोघरी मातीच्या चुली ..त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात संकट,संघर्ष, वादळ,दुःख हे असतंच…माझ्याही आहे…पण त्या प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडायला हवं..ज्या गोष्टी अटळ आहेत त्यांचा सामना तर करावाच लागणार…पण जास्तच चिटकून बसायचं नाही…जीवनसत्य स्वीकारत पुढे पुढे चालायचं…”हसरी सकाळ अनुभवण्यासाठी”….ती आपली प्रतीक्षा करीत आहे फक्त आपण अंधारासी लढलं पाहिजे…!!!.
“अधूनमधून आनंदी सकाळ
सर्वांच्याच आयुष्यात यावी
अंतरीचे दुःख वेदना सारी
आनंदात त्या विलीन व्हावी..!”
या मंगल कामनेसह पुनश्च एकदा मी माझ्या शिलेदार परिवारातील सर्व सन्माननीय दादा/ताईंचे ऋणयुक्त धन्यवाद व्यक्त करते…सर्व विजेत्या आणि सहभागी सारस्वत दादा /ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन करते… “आपल्या प्रेरणा हेच माझ्या लेखणीचे बळ..!” असं आवर्जून नमूद करते आणि माझ्या लांबलेल्या लेखणीला विराम देते..!
सौ-राजश्री मिसाळ ढाकणे बीड
कवयित्री/लेखिका/हायकूकारा
सदस्या-मराठीचे शिलेदार समूह