महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात
रजत डेकाटे, प्रतिनिधी भिवापूर/उमरेड
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात
शिर्डीच्या पेन्शन राज्य महाअधिवेशनात येणार पेन्शन शिलेदारांचा महापूर
रजत डेकाटे, प्रतिनिधी भिवापूर/उमरेड
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन, शाखा-उमरेड ,भिवापूर येथे शिक्षक -शिक्षकेत्तर तथा सर्व विभागाचे सर्व पेन्शनविहिन कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा व पेन्शन राज्य महाअधिवेशन,शिर्डी नियोजन सभा आज (दि ३१) पंचायत समिती उमरेड येथील सभागृहात उत्साहात पार पडली.
सदर पेन्शन स्नेहमिलन सोहळा व पेन्शन राज्य महाअधिवेशन नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी अतुल खांडेकर जिल्हा संयोजक, प्रमुख मार्गदर्शक सुरज येल्ले तालुकाध्यक्ष भिवापूर ,राम डाखोरे केंद्रप्रमुख नगरपरिषद विभाग वंदना पौनिकर जीवन विकास वनिता विद्यालय उमरेड, प्रल्हाद घरडे पंचायत समिती प्रमुख उमरेड यांनी पेन्शन शिलेदारांना याप्रसंगी मार्गदर्शन केले.
आयोजित सभेचे प्रास्ताविक अतुल खांडेकर जिल्हा संयोजक यांनी केले व संघटनेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. सूरज येल्ले यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची निर्मिती ज्या संत भूमीतून झाली त्याच भूमीत संघटनेचे पहिले राज्य अधिवेशनात आयोजित करून जुनी पेन्शन लागू होणारच अशी साई चरणी प्रार्थना केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सोबतच मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त शिक्षक – कर्मचारी यांचा सभामंचाच्या हस्ते लेखणी देऊन स्वागत करण्यात आला.
दि. १५ सप्टेंबर,२०२४ ला आयोजित पेन्शन राज्य महा अधिवेशन, शिर्डी येथे सर्व पेन्शन शिलेदारांनी उपस्थित राहून जुनी पेन्शनची मागणी बळकट करण्याचे आव्हाहन अतुल खांडेकर, सूरज येल्ले यांनी केले. पेन्शन संघटनेच्या सातत्यपूर्ण पेन्शन लढ्यामुळे आजपर्यंत मिळालेल्या यशाबद्दलची माहिती देण्यात आली
शासनाच्या चुकीच्या नितीमुळे नवीन कर्मचाऱ्यांवर शिक्षण सेवक पद लादून महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनात दुर्गम व अवघड क्षेत्रात सेवा देतांना होणाऱ्या त्रासामुळे दमछाक होते, त्यामुळे जाचक शिक्षण सेवक पद शासनाने रद्द करावे व समान काम-समान वेतन-समान पेन्शन या धोरणानुसार एकसूत्रता आणावी, शासनाने जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, असे प्रतिपादन नवनियुक्त शिक्षक कर्मचारी धम्मदीप देवतळे, अर्चना गिते, विलास जोपळे यांनी केले.
नगरपरिषद शिक्षकांना NPS ची कोणत्याच प्रकारची कपात होत नसल्याबाबत ती सुरु व्हावी अशी व्यथा नगर परिषद शिक्षक प्रसाद चौहाण व राम डाखोरे यांनी मांडली नवीन पेन्शन योजना ही घातक – आर्थिकदृष्ट्या जाचक असून आता व भविष्यातही याचे विपरीत परिणाम होतील. त्यासाठी जुनी पेन्शन योजनाच सेवानिवृत्तीनंतर म्हातारपणाची लाठीकाठी असून त्यासाठी अविरत लढत राहूया, तसेच संघटना निर्मिती, तालुका जिल्हा-राज्य व देशपातळीवर जुनी पेन्शन मागणीची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे, नवीन पेन्शनविहिन कर्मचाऱ्यांच्या समस्या-अडचणी सोडविण्यासाठी कोणकोणते प्रयत्न संघटनेमार्फत केले जात आहेत, येणाऱ्या काळात जुनी पेन्शन मिळण्याचे मार्ग कोणते आहेत याचे सविस्तर वर्णन व मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.
यानंतर विभागनिहाय कर्मचारी यांचेशी विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली. जुनी पेन्शन लागू करा, शिक्षणसेवक पद रद्द करा, कर्मचारी एकता जिंदाबाद या नाऱ्यांनी सभागृह दुमदुमला. संघटनेच्या स्नेहमिलन सोहळा व नियोजन सभेला उमरेड,भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-शिक्षिका, खाजगी शाळेतील शिक्षक,नगर परिषद शाळेतील शिक्षक,, महिला बालकल्याण, वन, कृषी, जल, आरोग्य, महसूल, पंचायत समिती लेखनिक विभाग अशा सर्व विभागातील शिला रोडे,सुधीर पाटील,अरुण वरघणे कुशल रोडे, हेमंत चौधरी, मनीषा पांगुळ, प्रशांत गभने, आशिष कामडी, अनिल गेडाम, जयश्री गेडाम, कल्याणी कामडी (खांडेकर), के. आर. श्रीरामे सर लोकेश बोरसरे, श्रीकृष्णा चित्रीव,हेमंत चौधरी,एस. एच. पिंपळे, नीलकंठ विधाते, महेश चावके, अमित तोंडे,सौं. रेखा गभने, पेन्शन शिलेदार उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचलन चेतन देवतारे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले तर आभार महेश हांडे तालुका संघटक यांनी मानले.