‘जैन हेरिटेज अ कॅम्ब्रीज स्कूलच्या चिमुकल्यांची उंच भरारी’
‘जैन हेरिटेज अ कॅम्ब्रीज स्कूलच्या चिमुकल्यांची उंच भरारी’
नागपूर: ‘भगवानदास पुरोहित विद्यालय, आष्टी, नागपूर’ या शाळेत दिनांक २८ ऑगस्ट व २९ ऑगस्ट २०२४ रोजी आंतरशालेय क्रीडा सामने भरविण्यात आले होते. यामध्ये विविध शाळांनी सहभाग घेतला होता.
या सामन्यामध्ये जैन हेरीटेज अ कॅम्ब्रीज स्कूल चे पूर्व प्राथमिक व प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळून या स्पर्धेत आपला उच्चांक गाठला या आंतरशालेय क्रीडा सामन्यानंमध्ये २५ शाळा पैकी जैन हेरीटेज अ कॅम्ब्रीज स्कूलच्या विद्यार्थानी तीन सुवर्ण व चार रजत पदक, प्रमाणपत्र तसेच विजेता चषक मिळवून आपले मानाचे स्थान पटकावले.
यामध्ये सुवर्ण पदक अनाया बडोले, जाई बांबल, मनन नितनवरे तसेच रजत पदक अर्जान सय्यद, दिव्यानि टोंगे, मोहम्मद बख्तियार, आरोही जाधव यांना मिळाले. शाळेसाठी ही मोठी अभिमानास्पद बाब आहे. शाळेचा मुख्याध्यापिका माननिय राणू साहानी मॅम, उपमुख्याध्यापिका माननिय अर्चना तिवारी मॅम यानी विद्यार्थाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील क्रीडा शिक्षक अनिल चव्हान सर तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका प्रियंका दत्ता व हर्ष पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थांनी खेळांचा सराव करून आपली जय्यत तयारी केली होती शाळेमध्ये अभ्यासा बरोबरच विध्यर्थांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला जातो.





