जि.प.केंद्रीय प्रा. शाळा नरसी येथे महाराष्ट्राच्या लेकींचा सन्मान
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मांडला सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष
जि.प.केंद्रीय प्रा. शाळा नरसी येथे महाराष्ट्राच्या लेकींचा सन्मान
सावित्रीबाई फुले जयंती ‘बालिका दिन’ म्हणून उत्साहात साजरी
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मांडला सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष
जिल्हा प्रतिनिधी, नांदेड
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नांदेड (दि ३ जाने): नायगाव तालुक्यातील सर्व क्षेत्रात उपक्रमशील असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी येथे आज दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी थोर समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आज (दि ३ जाने) ‘बालिका दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्याबाई माधवराव शिंदे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे (सरपंच) होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मा. कपिलेश्वर नलवलवार सरलाभले. प्रमुख उपस्थितीत सौ. कालिंदाताई देवपुजे मॅडम व व्याख्यानासाठी शोभा तोटेवाड मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत श्री एस.एन जांभळीकर सरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षाविषयी माहिती सांगितली.
श्री बळवंत डावकरे सरांनी बालिका दिना निमित्त स्वरचित कविता सादर केली. प्रमुख व्याख्याता सौ. तोटावाड मॅडमनी बालिका दिनाचे महत्त्व, महिला सक्षम, पाल्याच्या शिक्षणात माता पालकाची भूमिका या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सौ. देवपुजे मॅडमने ही पालकांना मार्गदर्शन केले .यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रभावी मनोगत व भाषणे सादर केली.
सहभाग घेतलेले विद्यार्थी :
*वर्ग दुसरा*
माहिन सैलानी सय्यद
शाहेस्ता चाँदपाशा सय्यद
*वर्ग तिसरा*
स्वरा माधव इळगे
स्वरा शिवानंद पाटे
माहिन सद्राम सय्यद
रविराज जयवंत कांबळे
*वर्ग चौथा*
कोमल विठ्ठल निलेवार
वैशाली एकबाल मिसे
अंजली माधव बट्टेवाड
आलीशा पाशा शेख
*वर्ग पाचवा*
श्रद्धा सुधाकर मेहत्रे
उषा विठ्ठल तळणे
शुभांगी साईनाथ वडजे
शिवानी संभाजी मेहत्रे
*वर्ग सहावा*
शगुप्ता जमाल सय्यद
ज्ञानेश्वरी मारोती कुंडकर
सादिक शादूल सय्यद
श्रद्धा शंकर जाधव
*वर्ग सातवा*
आश्विनी शिवाजी वडजे
दुर्गा मारोती मेकाले
साक्षी विजय बोईवार
विद्या मददेवाड
पूजा बट्टेवाड
श्रुतिका नारे
कोमल चव्हाण
या सर्व विद्यार्थ्यांच्या भाषणा नंतर अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्याच्या माता उपस्थित होत्या. यावेळी सर्वमातांचे शाळेतील शिक्षिकांनी पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. सर्वांना उल्पोहर व विद्यार्थ्यांच्या जेवनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधाकर उल्ले सर, जांभळीकर एस. एन. सर, सौ. मनिषा नरसीकर मॅडम, व्ही. एन. पचलिंग मॅडम, डावकरे बळवंतराव सर व जावेद दौलताबादी सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व्यंकटराव जाधव सर यांनी केले.



