0
4
0
9
0
3
दामिनी
झंकारताच दामिनी
उठती नभात रेघ
देण्या पुष्टी दामिनीला
करतात गर्दी मेघ //१//
मांडली नवी आरास
जणू धगधगते दृश्य
क्षणात उमटे आणि
होई क्षणात अदृश्य //२//
दश दिशातून येई
वादळाची आर्त साद
उभी घट्ट काळोखात
देई आगळा प्रल्हाद //३//
फक्त नवे ती प्रकाश
असे ज्वाळेची चेतना
गगनात नाचताना
वाटे भय नि यातना //४//
कधी देतसे तू धीर
कधी वाटते ग भीती
अश्रूमागचं कारण
तर कधी सुखावती //५//
दिनकर केशवराव झाडे
गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर
========
0
4
0
9
0
3





