‘त्या’ नराधमाला फाशी द्या; आदिवासी मुलींची चोपड्यात निदर्शने
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
‘त्या’ नराधमाला फाशी द्या; आदिवासी मुलींची चोपड्यात निदर्शने
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव: (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.८ सप्टे.) चोपडा शरद आदिवासी समाज बांधवाच्या वतीने चोपडा शहर पोलीस स्टेशनला मूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी या मूक मोर्चाचा माध्यमातून करण्यात आलेली आहे.
हिस्त्र प्राण्यांची भीती नाही परंतु माणसांची भीती वाटू लागली आदिवासी मुलींची व्यथा.
चोपडा तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ चोपडा शहरात आज आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मूक मोर्चा काढून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली सदर मूक मोर्चा डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या हॉस्पिटल पासून काढण्यात आला या मूक मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थिनी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी सहभाग झाले होते चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे मोर्चाला संबोधित करताना डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या अश्रू अनावर झाले.
यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आलं यावेळी मूक मोर्चा सहभागी झालेल्या आदिवासी मुलींनी सांगितलं आम्हाला शेतात व समाजात वावरताना हिंस्त्र प्राण्यांसोबत भीती वाटत नाही परंतु माणसांची भीती वाटू लागली असल्याचे यावेळी सांगितलं.