केशव लेदे’ शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित
पाचवे राज्यस्तरीय मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अधिवेशन संपन्न
‘केशव लेदे’ शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित
पाचवे राज्यस्तरीय मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अधिवेशन संपन्न
लेदे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
भंडारा. (दि १८): महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पाचवे राज्यस्तरीय भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात दि १६ रोजी संस्थापक प्रवीण मेश्राम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
लक्ष्मी सभागृह भंडारा येथे पार पडलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्राथमिक शाळा ब्रम्ही ता. पवनी येथील मुख्याध्यापक श्री.केशव लेदे यांना “शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पवनी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केलेल्या लेदे सरांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.