प्रजासत्ताक दिनी अलिबागचे विद्यार्थी दिल्ली कर्तव्यपथावर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
प्रजासत्ताक दिनी अलिबागचे विद्यार्थी दिल्ली कर्तव्यपथावर
जे. एस. एम.चे विद्यार्थी सादर करणार पारंपरिक नृत्य
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जे. एस. एम. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ध्वजवंदनानंतर भारताचे माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू व भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी तसेच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे विद्यार्थी लावणी, कोळी नृत्य, वारी, महाराष्ट्रातील इतर काही आदिवासी नृत्य या नृत्य प्रकारातील आपली नृत्यकला सादर करणार आहेत.
यासाठी श्रेया स्वप्निल अधिकारी (SYBA), अथर्व अमोल भगत (TYBcom), नेत्रा भास्कर जोशी (SYBA), सार्थक संदेश शेळके (SYBA), प्रणव प्रसन्ना टावरी (SYBcom), हिमानी अविनाश रिसबूड
(TYBA), श्रुती शिवाजी नाईक (TYBsc) या विद्यार्थ्यांची निवड झाली असून सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या सराव शिबिरात हे विद्यार्थी सामील झाले आहेत. जे. एस. एम. कॉलेजसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अन्य राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी कु. श्रेया अधिकारी व अथर्व भगत यांची सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून देखील निवड झाली आहे. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.श्वेता पाटील, रायगड जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. जयेश म्हात्रे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून त्यांना या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





