कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन
प्रमोद मुरार कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वर्धा यांची माहिती

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन
प्रमोद मुरार कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वर्धा यांची माहिती
वर्धा. (दि १७): कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आणि खासगी शिक्षण संस्था मधील मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्ना संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य चे राज्यमंत्री मा ना. पंकज भोयर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
1)निवेदनात 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा.
2) स्थानिक संस्थेतील शिक्षकांच्या रिक्त पदाची भरती करण्यात याव
3)जि प कर्मचाऱ्यांप्रमाणे जि प शिक्षकांनाही अर्जित रजेचे रोखीकारण करण्यात यावे.
4) केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे प्राथमिक शिक्षकांमधूनच पदोन्नतीने भरण्यात यावे.
5) वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि वेतन थकबाकीची प्रलंबित निधी देण्यात यावा.
6) मा. सर्वोच न्यायालयाच्या civil Apeal नो. 7699 ऑफ 2014 या जजमेंट कडे दुर्लक्ष करून व सेवाजेष्टता डावलून नागपूर जिल्ह्यात केंद्र प्रमुख पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या. त्याची चौकशी करून पदोन्नत्या रद्द करण्यात याव्या.
6) पदोन्नतीत मागास्वर्गी्यांना आरक्षण देण्यात यावे.
7)उपशिक्षणाधिकारी पदावर माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नत्या करण्यात याव्या.
8)बिंदू नामावली अद्यावत न करणाऱ्या शिक्षण संस्थावर कारवाई करण्यात यावी.
10) मागासवर्गीय शिक्षकांच्या जागा न भरणाऱ्या शिक्षण संस्थावर कारवाई करण्यात यावी.
11) नियमानुसार मुख्याध्यापक पदावर पदोन्नती न देणाऱ्या शिक्षण संस्थावर कारवाई करण्यात याव
13) सातव्या वेतन आयोगानुसार इतर कर्मचाऱ्या प्रमाणे शिक्षकांनाही 10-20-30 वर्षा नंतर ची वेतनश्रेणी देण्यात यावी.
14) कमी पटसंख्येचे कारण दाखवून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येऊ नये.
15)प्रशिक्षित पदवीधर / विषय शिक्षकांचे पद पदोन्नतीमध्ये गणण्यात यावे.
16) मागासवर्गीय मुलींना मिळणारा उपस्थित भत्ता मध्ये 1995 पासून वाढ झाली नाही. त्यात वाढ करण्यात यावी.
17) राजीव गांधी अपघात विमा योजनेच्या पेंडिंग केसेस काढण्यात यावे.
18) जि प शिक्षण समितीवर मागासवर्गीय शिक्षक प्रतिनिधी म्हणून सर्वांत मोठी संघटना म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी घेण्यात यावा.
पदोन्नतीत अडचण निर्माण करणारी 2014 ची अधिसूचना रद्द करणे आदिसह विविध मागण्याचे निवेदन शालेय शिक्षण राज्यमंत्री मा ना. पंकज भोयर यांना विश्रामगृह वर्धा येथे नुकतेच देण्यात आले.
याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य मुख्य संघटन सचिव परसरामजी गोंडाणे, वर्धा जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार, राज्य अतिरिक्त सरचिटणीस सुभाष गायकवाड नागपूर विभागीय अद्यक्ष प्रबोध धोंगडे, युवराज मेश्राम, राजू नवनागे उमेश फुलमाळी, नितेश कालपांडे, आर पी थुल, योगीराज पाटील यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.