Breaking
चारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट चौदा🌈🌈🌈*

*☄विषय : झिजलेला देह*☄
*🍂शनिवार : १५ / मार्च /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*झिजलेला देह*

झिजलेला देह आज
हेळसांड नको करु
आयुष्यात तुझ्या होता
तोच बाप कल्पतरू

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

आयुष्याचा हिशेब करता
बाकी उरतो फक्त मोह
मोहासाठी झिजतांना परत
पहात राहतो हा झिजलेला देह

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

आईचा झिजलेला देह मला
नेहमी नकळत साद द्यायचा,
जीवना प्रत्येक कृतीस जणू
आनंदे तर प्रतिसाद द्यायचा.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*झिजलेला देह*

वाकला कणा,झिजलेला देह
बळीराजाचा करावा विचार ।
गाळलेल्या घामाचे मोल जाणूनी
तयास देऊ भक्कम आधार।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

नको करू मानवा
सुंदरतेचा स्नेह
उतारवयात तोच होतो
झिजलेला देह

*सौ .तृप्ती वंजारी तुमसर भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

बाप राब राबतो
उन्हातान्हात शिवारी
घामाने झिजलेला देह
देतो जगण्याची उभारी

*विवेक पाटील*
*मालेगाव (नाशिक)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

आपलाच शरीर आपल्याला
जानवत असतो क्षीण
तो झिजलेला देह असतो
दिवसांदिवस होत जातो हीन

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह..*

नको झालेला श्वास
तो झिजलेला देह
प्रपंचाची गोळाबेरीज
सरतेशेवटी नको संदेह..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव – रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

कष्ट करून थकतंय शरीर
मन मात्र असतं ताजतवानं
शक्ति मात्र झाली दुबळी
झिजलेला देह असतो क्षीणं

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

संसारासाठी झिजलेला देह, विठ्ठला
आता विसावू दे तुझ्या चरणापाशी…
तुझ्या या लाडक्या लेकराला
घे विठुराया प्रेमाने तुझ्या कुशी….

*सौ स्वाती धोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

झिजलेला देह हा
समजू नका बिनकामाचा
सोसून कष्ट अपार
मजबूत केला पाया तुमचा

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

झिजलेला देह आईचा
चालतो काट्याकुट्याची वाट
पुढ्यात लेकराच्या सुखाचे स्वप्न
शोधते संपन्नतेचा थाट

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

झिजलेला देह तिचा जरी
कष्टात कसर नाही तरी
संसारासाठी राब राब राबते
हिच माय माऊली खरी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
*झिजलेला देह*

*राबराबून तुजसाठी*
*काडं हाडाची करतो*
*झिजलेला देह आज*
*वृद्धाश्रमातच मरतो*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे