कपड्याचा दुकानात काम करून बनला रोशन पोलीस शिपाई
स्वतःच अभ्यास, सराव करत गाठले ‘सीआरपीएफ’ मध्ये शिपाई पद
शेतमजूराच्या मुलाने उंचावली मान
अखिल राजू रोडे, प्रतिनिधी
उमरेड/ सिर्सी: (दि २७) सिर्सी गावातील रोशन रामेश्वर शेंडे युवकाची केंद्रीय राखीव पोलिस दल नुकतीच निवड झाली. रामेश्वर शेंडे गावातील गरीब, नम्र कुटुंब यांचा व्यवसाय म्हणजे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे.आई शारदा शेंडे शेतात कापूस वेचणीचे काम करतात. यांचा लहान मुलाची नुकतीच पोलिस शिपाई म्हणून निवड झाली.
रोशन रामेश्वर शेंडे यांनी कपड्याच्या दुकानात काम करत आपले MSW चे शिक्षण पूर्ण केले. आई – वडील शेतमजूर यामुळे परिस्थिती पाहून पोलिस भरती द्यायची असा निर्णय घेत त्यानुसार शारीरिक सराव व सेल्फ अभ्यास सुरू केला. २०२४ ला होमगार्ड भरती झाली त्यात रोशन ची निवड झाली.केंद्रीय राखीव पोलिस दलाची भरती मध्ये तीन वेळा शिपाई पद हुकले परंतु चौथ्या वेळा रोशनने यश संपादन केले.
रोशन आपल्या यशाचे श्रेय आई – वडील , आशिष तायडे सर , प्रतिक जामगडे सर ( युवा प्रहार व संयोग क्लासेस उमरेड )यांना दिले. रोशन ला आशिष तायडे आणि प्रतिक जामगडे यांनी स्पर्धा परीक्षा बद्धल आणि ग्राउंड बद्धल योग्य मार्गदर्शन केले. गावातील युवा वकील सतीश शास्त्रकार यांचे पण मोलाचे मार्गदर्शन रोशन ल मिळाले याबाबत रोशन नी सर्व मार्गदर्शकांचे आभार मानले.
सीर्सी गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाबत पोषक वातावरण निर्माण व्हावे. युवकांना प्रशासनाने ग्राउंड उपलब्ध करून द्यावे.समोर पण मी स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याच्या निर्धार आहे.
रोशन रामेश्वर शेंडे



