जे. एस. एम. महाविद्यालयाची एच. एस. सी. बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

जे. एस. एम. महाविद्यालयाची एच. एस. सी. बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
विज्ञान शाखेचा निकाल 96.48 तर कला शाखेचा निकाल 92.59 %
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज मिडीया
अलिबाग : (दि ४) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जे. एस. एम. महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली यशाची परंपरा कायम राखत उत्कृष्ट निकाल लावला आहे.
महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा सरासरी निकाल 96.48 % आणि कला शाखेचा सरासरी निकाल 92.59 % लागला आहे. विज्ञान शाखेतून कु. आलिया इम्रानखान नाईक व कु. श्रेया निलेश म्हात्रे या विद्यार्थिनींनी 86.83 % गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त तर कला शाखेतून कु. माही मंगेश ठाकूर या विद्यार्थिनिने 87 % गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयाचा संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान शाखा – मयुरेश शैलेश पाटील – 84.33 % – द्वितीय क्रमांक, सार्थक सचिन म्हात्रे 83.83 % – तृतीय क्रमांक. कला शाखा- कु. श्रावणी रणजित आलमाने 85 % द्वितीय क्रमांक, कु. आर्या संदेश आठवले 84.33 % -तृतीय क्रमांक. महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून एकूण 384 विद्यार्थी तर कला शाखेतून 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उप -प्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक श्री. अजय सावंत आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील यांच्या शूभहस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. सौ. साक्षी पाटील, सचिव श्री गौरव पाटील, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक यांनी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



