0
4
8
2
9
0
भरकटलेला
हरवली रात्र
दिवस हरवला
बदनाम गल्लीत
तो चंद्र मिरवला
स्वच्छ, निर्मळ आकाश
त्यास भावले नाही
ग्रहणाचे चटके सोसण्या
पुढे सरसावला
झाला असा आकर्षित
विसरुन लोक,लाज,रीत
वाटले जणू हेच
मधूर जीवन संगीत
ती गल्ली वेळीवाकळी
वेदनेची अखंडीत साखळी
हरवला, झाला भकास
आठवतो आता ते प्रेमळ आकाश
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड, नागपूर
========
0
4
8
2
9
0



