
0
4
0
9
0
3
ज्योती
सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी
साथ तुझी लाभली,
आनंद माझा ओळखून
स्वतःची स्वप्ने तू विसरली.
गेली पंचवीस वर्षे तू
लेकऱ्यांना माया दिलीस,
घराचा डोलारा उचलून
प्रत्येकाला सुख दिलंस.
आई गेल्यावर तूच झालीस
आईच्या रुपातील छाया,
माझ्या जगण्याला तू दिलीस
प्रेम, आधार आणि माया.
आज वाढदिवशी प्रार्थना माझी,
पंढरीच्या विठ्ठल चरणी —
सुख-समाधानाने बहरू दे आयुष्य,
तुझं हास्य कधी न मावळो धरणी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
सौ. ज्योती ज्ञानेश्वर माशाळकर!
डॉ.ज्ञानेश्वर माशाळकर
जि धाराशिव
0
4
0
9
0
3





