
0
4
8
2
9
5
नाते
लग्नाची बोलणी झाली,
दोन कुटुंबे एकत्र आली,
मानपानाची गंमत झाली//
दोघांचे नाते जुळले,
तन-मन एक झाले,
प्रेमवेड ते सुखात न्हाले//
विचारांची गल्लत सुरू झाली,
हळूहळू नाते दुरावली,
संयमाने ती सुखावली//
होता नात्यांची कुस्ती,
घरात मूकबधीरांची स्थिती,
हरवली घरातली मस्ती//
संपत चालला होता संवाद,
पसरत होता एकटेपणाचा वाद,
केला एकोपा जपण्याचा नाद//
ऋणानुबंध जपण्यास,
नाती आणि संयम कामास,
सुखदुःखातही धीर माणसास//
हरला माझा ‘मी’पणा,
साधले मात्र घरपण,
हारूनही जिंकले माणूसपण//
उर्मिला गजाननराव राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर
=======
0
4
8
2
9
5



