Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

कोरडा पाऊस; संग्राम कुमठेकर

लातूर

0 4 8 2 9 7

कोरडा पाऊस

कोरडा पाऊस ! शमवी ना तृष्णा !!
आळविते कृष्णा ! प्रेमसखा !!

वाजता मुरली ! मेघं ही फिरली ! !
तुडुंब भरली ! नदीनाले !!

बासरी जादूई ! रिकामी ओसरी !!
हवा ही बोचरी ! झोंबे अंगा !!

कृष्णलीला भारी ! ओढ लागे जीवा !!
मालविते दिवा ! सांजराती !!

सोबती जन्माचा ! वाटेकरी खास !!
सुख दुःखातील ! प्रेमहार !!

दुष्काळ संपला ! कशाची ना कमी !!
आनंदाची हमी ! जीवनात ! !

नको पुन्हा आता ! पाऊस कोरडा ! !
आरडा ओरडा ! पोटासाठी ! !

हिरवा शिवार ! धान्याची चंगळ !!
नको तो मंगळ ! अविचारी !!

तुटतोय जीव ! सख्या सुखासाठी !!
बन तूच काठी ! दुर्बलांची !!

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे