Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“मानवी मेंदू म्हणजे, चमत्कृतीपूर्ण विचारांचा केंद्रबिंदू”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे काव्य परीक्षण

0 5 3 4 0 0

“मानवी मेंदू म्हणजे, चमत्कृतीपूर्ण विचारांचा केंद्रबिंदू”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे काव्य परीक्षण

अखिल ब्रम्हांडातील असंख्य जीवातील माणूस हा एक असा जीव आहे की, तो स्वतःच्या बुद्धीचातुर्यावर ब्रम्हांडाच्या उत्पत्तीचा वेध घेत आला आहेच. मात्र याच ब्रम्हांडाला उध्वस्त करण्याची (?) क्षमता सुद्धा बाळगून आहे. मानवी मेंदू म्हणजे चमत्कृतीपूर्ण विचारांचा केंद्रबिंदू आहे असे म्हटल्यास नवल वाटू नये. आदिमानव ते आजचा विज्ञानयुगीन मानव अनेक स्थित्यंतरे अनुभवत आला आहे. आणि त्या त्या काळात अशा कांही अचाट, अद्भूत, मान्यता त्याने मागे सोडल्या आहेत की, त्याच्या सत्यतेला कोणताही ठोस आधार नसला तरीही त्याचे गारूड आजही मनावर कायम आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे “भूत”.. !!!

अनादी काळापासून या प्रकाराचा पगडा मानवी मनमेंदूवर कायमचा कोरला आहे. आणि याचाच गैरफायदा काही लोक पद्धतशीरपणे घेताहेत. याचा अघोरी वापर करत अंधश्रद्धाळू, भोळ्या भाबड्या मानसिकतेच्या लोकांचा, शारीरिक, मानसिक, अर्थिक छळ पद्धतशीरपणे केला जातो. आपण सकाळ किंवा सायंकाळी वेळी सूर्यासमोर उभे राहिलो तर आपली सावली खूप लंबाकृती पडते. मात्र दुपारच्या वेळी तीच सावली पायात येते अर्थात आखूड होते. यातले विज्ञान आपण जाणताच. मात्र अशाच घटनेंना विचित्र संदर्भ देत भास, आभास, अतार्किक कल्पना, भय, अनेकांच्या मनावर बिंबवले जाते. जे नाही ते आहे असे भासवताना तेच आपल्या काबूत असून त्याद्वारे काही भोंदू बुवा तांत्रिक मांत्रिक असे भासवतात की आंम्ही लोकांना या माध्यमातून हवे ते मिळवून देऊ. आणि मग यातूनच सुरू होतो एक जीवघेण्या कुरघोडीचा अघोरी प्रकार…

आता आपण ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेल्या चित्र विषयाकडे वळूया. चित्रात दिसणारी पुसट स्री आकृती भ्रामकतेचे प्रतिक असून. स्पष्ट दिसणारा पुरूष वास्तविकतेचे प्रतिक आहे. मागे गडद अंधाराच्या पार्श्र्वभूमीवर विचित्र दिसणारी स्री आकृती मनात भय. कुतुहल निर्माण करते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विचार करता अशी प्रतिमा जनमनात भयाचे बीज पेरते. काहीजण यालाच अलौकिक शक्तीचे अस्तित्व मानतात. तर काहीजण कल्पनारंजन म्हणून दुर्लक्ष करतात. विज्ञान मात्र अलग दृष्टीकोन देते अंधारात मानवी मेंदू अपूर्ण माहितीवरून किंवा भ्रामकतेतून आकृती तयार करतो. वेगवेगळ्या कोनातून आलेल्या प्रकाशामुळे वस्तूचे मूळ रूप बदलते.

जसे सकाळ किंवा दुपारच्या उन्हात सावलीचे रूप बदलते तसे. म्हणून ते कधी कधी भयावह वाटते. याचाच वापर दृकश्राव्य माध्यमातून मनोरंजनासाठी भयानक भूतकथासाठी कल्पकतेने केला जातो. प्रयोगशील व्यक्तींना अशा माध्यमातून विचारांची नवी दालने खुली करता येतात. याचीच दुसरी बाजू म्हणजे अशा प्रतिमा काही लोकांत अनाठायी भिती, गैरसमज, अंधश्रद्धा वाढवू शकतात. एकंदरीत ही आकृती फक्त भय न दाखवता मानवी मेंदूतील अचाट कल्पनाशक्तीचे दर्शन घडवते. ती प्रश्न विचारते की जे दिसते ते खरेच असते का? आणि याचवेळी सारासार विवेक बुद्धी, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन जागृत होणे अपेक्षित असते.

असा विषय जेव्हा हायकू लेखनासाठी येतो तेव्हा हायकूकारांच्या मनात स्पष्टता असणे आवश्यक असून. हायकूच्या माध्यमातून प्रेरक मांडणी अपेक्षित आहे. ज्यातून सृजन, परिवर्तन आणि योग्य दृष्टीकोन दिसला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट करणारा विचार व्यक्त झाला पाहिजे. सर्वांचे प्रयत्न दर्जाच्या कसोटीवर उतरणारे असावेत याकरिता विशेष अभ्यास जरूर करावा. आज मला हायकू परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार.

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/ कवी/ लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे