Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनवर्धाविदर्भ

भन्नाट रानवारा

पवन सु. किन्हेकर बोरगाव, जि.वर्धा

0 5 3 6 4 3

भन्नाट रानवारा

नाविण्यपूर्ण संकेत कल्पुनी
सुटलाय गो भन्नाट रानवारा
घोंघावणारे वादळ शमले
शीळ वाजवित आला वारा ||

शुद्ध झुळूक सुसाट ती हवा
प्रितीचं झुळझुळ पाणी
प्रितसागरा प्रभावित झाला गारवा
वाऱ्याची ऐकता मंजुळ गाणी ||

सांजवेळी बरसते आचलधारा
हृदयाच्या मळ्यामधी रोवे बिज
नव्या नवरीपरी शृंगारली भूमी
नक्षत्रफुलांनी बहरला साज ||

खुळचट भोंदू विचारांचे केले निंदण
उधाण ऊत येऊच दिले नाही
अविचार चमत्कार थैमानले नाही
त्रिकाल कायापालट साक्ष ग्वाही ||

हवा पाहून दिवा मांडला
जुनाट वाटेला कळेना वाऱ्याची दिशा
भन्नाट संकल्पना सुचेना काही
‘पवन’ म्हणे ज्ञानाअभावी दशा ||

पवन सु. किन्हेकर
बोरगाव, जि.वर्धा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 4 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे