Breaking
कवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील बालकविता

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : कच्याच कै-या📘*
*🔸मंगळवार : ११ / मार्च /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*कच्याच कैऱ्या*

आंब्याच्या झाडावरती
हिरव्यागार पानाआडून..
हिरव्या कच्याच कैऱ्या
पाहतात जणू डोकावून…

कच्याच कैऱ्या खायला
आवडतात आम्हाला..
मीठ हातावर घेऊन
आंबट चव चाखायला…

खुणवितात जणूकाही
आम्हा बालगोपाळाला..
पिकण्याआधी चाखून
कैरीचा आनंद लुटायला…

हाताला येतील तेवढ्या
घ्याव्या कचकच तोडून..
ऊंच फांदीवर लटकत्या
पाडाव्या दगडं मारून…

कच्याच कैऱ्या खातांना
वेडेवाकडे तोंड करून..
दाखायचे दात वेगळेच
गोड आहे आव आणून…

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥭🥭🥭➿➿➿➿
*कच्च्याच कैऱ्या*

कच्च्याच कैऱ्या
खायला लय भारी
चवीला आंबुळ बऱ्या
मजा येते न्यारी ॥१॥

लगडल्या पान नी पान
सुटले तोंडाला पाणी
दिसती झाडावर छान
पाडती दगडाने कोणी ॥२॥

धावून आले चंगू मंगू
वेचल्या ओंजळभर
खाऊ लागली गंगू
झाले सारे पसार ॥३॥

मधुर कैऱ्यांची चव
जीभेवर रेंगाळत
मुलांना चढला चेव
खाती मीठात घोळवत ॥४॥

लहानांना कैऱ्यांचे
अपरूप असते भारी
समोर चित्र येई गावचे
असती कैऱ्या सभोवारी ॥५॥

आमराईतल्या झाडाला
असंख्य लोंबल्या कैऱ्या
कांही लागल्या पाडाला
चवीष्ट आंबट साऱ्या ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥭🥭🥭➿➿➿➿
*कच्च्याच कै-या*

कच्च्याच कै-या पाहून
सुटले तोंडाला पाणी
आंबट,तुरट चव त्यांची
खातो मजेत गाऊन गाणी

हिरवा हिरवा रंग छान
मनाला मोहवितो
बाळआंबे खाताना
तेल गाली उबजवतो

येते मुलांची टोळी
झाडाखाली घेती शोध
पाडती काही दगडांनी
निशाण्याचा अचूक बोध

तात्पुरते लोणचे घालून
भाकरीसंगे खाण्याची मजा
लाजवते पंचपक्वान्ना
कैरीचे लोणचे चविष्ट बघा

कच्च्याच कै-या म्हणून
करू नका दुर्लक्ष कदा
आमसुल होते छान
वापरा वर्षभर सदा

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥭🥭🥭➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कच्च्याच कैर्‍या*

आंबे मोहोर आला
सुवास आसमंतात
चोहीकडे दरवळला
कच्च्याच कैऱ्या पहा

मधमाशा येतात
फुलांवर बसतात
कच्च्याच कैर्‍यांना
निरखून पाहतात

कच्च्याच कैर्‍यांनी
झाड लगडून गेले
आंब्याच्या पन्हयानी
उष्माघात कमी होई

माकडांची टोळी आली
कच्च्याच कैर्‍यांची
मेजवानीच झाली
नासधुसही खूप केली

कच्च्याच कैर्‍यांचा
आई मेथी आंबा करते
दुपारच्या जेवणाचा थाट
चवदार एक नंबर होते

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥭🥭🥭➿➿➿➿
*कच्याच कैऱ्या*

दिसता लांबूनच आंब्यांचे झाड
मोह अनावर होतो मनाचा,
खाव्या वाटतात,
कच्याच कैऱ्या
कशास शोधू?आंबा पाडाचा.

धीट आम्ही बाल सवंगडी
भीती नाही वाटत राखनदाराची,
हेरू शेलक्या कच्याच कैऱ्या
इच्छा झाली अनावर खाण्याची.

दुपारची शाळा सुटल्यावर
कामं आमचें सुरु जाहले,
कोठे कोठे आहेत आंब्याचे झाडे
हुडकायला सारेच धावले.

ऊन नाही तहान नाही लागत
शोधाशोध सुरु झाली,
कच्च्या कैऱ्या पाडण्याची
शर्यत वानरसेनेची सुरु झाली.

दिवस हें बालपणी चे
स्मरतील जेव्हा जीवनात,
आठवण येता, भेटावे वाटेल
अनमोल ठेवा,जपून ठेवू आयुष्यात.

*मायादेवी गायकवाड*
*मानवत परभणी*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥭🥭🥭➿➿➿➿
*कच्याच कैर्‍या*

आजीचा बंगला
चिरेबंदी वाडा…
वाड्याच्या अंगणी
आंब्याचे झाडा.,.

वसंत ऋतुत
मोहरले झाड…
हीरवे हिरवे
कैर्‍यांचे घड…

रोज रोज खेळता
आम्हा तोंडाला पाणी…
तोडायच्या कैर्‍या
असे म्हटले तरी कुणी

योजना आखली
शेकाटी आणली.
बघून आम्हाला
आजीच धावली…

कच्याच कैर्‍या
तुम्ही तोडु नका
लेकराला आईशी
तुम्ही मोडू नका

जगु द्या त्यांनाही
झाडावर झुलत…
पडेल पाड तेव्हा
आंबा खाल मजेत…

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥭🥭🥭➿➿➿➿
*कच्याच कैर्‍या*

तळ्याच्या पारीवर
आंबाचं झाड.
आब्याच्या झाडाला
कैर्‍यांचा लड…

हीरव्या हीरव्या कैर्‍या
लागतात झुलु…
बघून कच्याच कैर्‍या
लागते मन डोलु..

भर उन्हात लागते
कैर्‍याची चाहुल..,
तोडायला द्यावी का
आजोबांना हुल

आजोबा म्हणले
हातपाय जोडु नका
कच्याच केर्‍या त्या
तुम्ही तोडु नका

पडेल पाड जेव्हा
गोड मिळेल गळ..
संयमाने वागलात
चांगलेच मिळेल फळ…

*प्रविण पाटील रत्नागिरी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥭🥭🥭➿➿➿➿
*कच्याच कैऱ्या*

मामाच्या रानात,
आंब्याच्या बनात..
सगळे मिळून जाऊ या
कच्याच कैऱ्या खाऊ या…१

आंब्याच्या बनात
म्हणे नाचतो मोर…
कच्याच कैऱ्या खाण्याचे
भाग्य आपले थोर…२

आम्ही आत्ते,मामे भावंड
मिळून आमराईत जातो…
कच्याच कैऱ्या खुप खातो
सगळे मिळून मजा करतो…३

कच्च्याच कैऱ्यांची
आई करते चटणी…
ते पाहून आमच्या
तोंडाला सुटते पाणी..४

आंब्याच्या डहाळीला
कच्याच कैऱ्यांची तोरणं…
कैऱ्यांसाठी आमराईत
मनसोक्त आमचं फिरणं…५

बाळांनो कच्च्याच कैऱ्या
तुम्ही नका रे तोडू….
झाडा, फुला, फळांशी
मैत्रीचे नाते जोडू…६

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥭🥭🥭➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे