Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणपरीक्षण लेखसाहित्यगंध

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले पत्रकार बळवंत वालेकर

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 3

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले पत्रकार बळवंत वालेकर

लेखक – राजेश मेहतर ,अध्यक्ष यादव गौळी समाज

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: यादव चौली गवळी समाज हा अल्पसंख्य असून तो रायगड मुंबई , ठाणे व सोलापूर जिल्ह्यात विखुरला आहे . या छोट्याशा समाजाची *एकजूट* वाखाणण्याजोगी आहे . भावीकाळाचा विचार करुन समाजधूरिणांनी समाज बांधवांकडून पै – पैसा गोळा करून *खंडाळे*(अलिबाग )
येथे जागा खरेदी केली व *तेथे सुमारे चार कोटी रुपये मूल्याच्या भव्य वास्तूचे ९५ टक्के बांधकाम झालेले आहे . या छोट्याशा समाजामध्ये अनेक मातब्बर व्यक्ती जन्मल्या असून त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला . ज्येष्ठ पत्रकार , रायगड भूषण व निव्रुत्त मुख्यध्यापक बळवंत वालेकर* (M. A. B. Ed. ) ‘त्यापैकी एक आहेत . आज दिनांक १२ डिसेंबर रोजी त्यांचा ८२ वा वाढदिवस असल्यामुळे हा लेख प्रपंच .

*वाघोली* ( अलिबाग) येथे जन्मलेल्या वालेकर सरांनी आपल्या गावापासूनच सामाजिक कार्यास सुरूवात केली . वयाच्या २३व्या वर्षी (१९६९ साली )
पेण – वाघोली S.T. सुरू करून या परिसराला S. T. चे दर्शन घडविले . तसेच M. I. D. C, च्या पेझारी – जळपाडा रस्ता मार्गे S. T. चालू करून रेवस बंदर व पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाश्यांकडून धन्यवाद मिळविले .
*तीनविरा – वाघोली – वाघ्रण* हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ७ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे . या रस्त्यापैकी तीनविरा ते विरवाडी पूल आणि वाघ्रण गाव ते वाघ्रणफाटा या प्रभागांचे डांबरीकरण जिल्हा परिषदेकडून झाले . पण विरवाडी पूल ते वाघ्रण गाव* हा २ कि. मी. लांबीचा भाग खारटणातील असल्यामुळे तो अतिखर्चाचा होता . *नाबार्ड* कडून २१ लाख रुपरांचा निधी १९९५ साली मँजूर झाला . परंतु सदर निधीचा वापर या रस्त्यासा ठी होत नव्हता. बातमीपत्पत्रे लिहूनही B and C ची कुंभकर्णी झोप उडत नव्हती. शेवटी बळवंत वालेकर यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना “उपोषणाची ” नौटिस देताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले .आणि त्या खात्याकडून या प्रभागाचे मातीकरण , मजबुतीकरण , खडीकरण व डाँबरीकरण केले गेले . लेखणीच्या फटका -याने तांत्रिक बाबीही सोडविण्यात यश आले.
*पेण , पोयनाडकडून रे वस बंदराकडे जाण्यासाठी कार्लेखिड मार्गा ऐवजी तीनविरा -वाघोली – वाघ्रण* या रस्त्याने प्रवास केल्यास ७ कि. मी. अंतर वाचते.शिवाय इंधन व वेळेतही बचत होते . म्हणून *वाघोलीमार्गे* रेवसकडे जाणाऱ्या या रस्त्याने तुफान वाहतूक चालू आहे .

*वाघोली* परिसरात अनेक गावे असून आदिवासीवाड्याही आहेत. पण वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण होत. प्रभाकर पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना पत्रकार वालेकर यांनी *पशुवैद्यकीय दवाखाना* (प्रथम श्रेणी ) व *प्राथमिक आरोग्य उपकेंद्र* यांची मागणी व्रुत्तपत्रामार्फत केली . आणि वस्तुस्थितीची पडताळणी जि. प, मार्फत केल्यानंतर या दोनही मागण्या कार्यान्वित झाल्या. म्हणून माणसे व पशू – पक्षांना वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या.
*आदिवासींसाठी १० एकर जमीन मिळविली* – सागरगड – माची येथील आदिवासीवाडी वन विभागात मोडत असल्यामुळे शासनाकडून रस्ता , वीज , पाणी या सुविधा मिळत नव्हत्या. लोकशाही मार्गाने सर्व अस्त्रांचा वापर करून शासनाबरोबर २५ वर्षे वालेकर सर झगडले.व १० एकर जमीन मिळविण्यात यशस्वी झाले. . आता या आदिवासीवाडीस रस्ता , वीज , पाणी , आंगणवाडी या सुविधा प्राप्त झाल्यामुळे त्तांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

*अधिस्वीक्रुतीधारक पत्रकारांना* S.T. प्रवासात प्राधान्य मिळावे तसेच विनाशुल्क प्रवास करण्यासाठी पूर्वी S.T. प्रशासनाकडून *कूपन्स* दिली जात . पण काही वाहक निमआराम एस्. टी. साठी *कूपन्स* अवैध ठरवीत. हा अन्याय दूर होण्यासाठी वालेकर सर यांनी S. T, चे रायगड विभागीय नियंत्रक (पेण) यां च्या कडे लैखी तक्रार केली . पण दाद लागली नाही . यानंतर जिल्हा दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली . त्यांनी तक्रारदार व S.T. प्रशासन यांना न्यायालयासमोर कैफियत मांडण्याची संधी दिली. ही कैफियत पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने *अधिस्वीक्रुतीधारक पत्रकारांची कूपन्स S.T च्या निमआराम गाडीसह सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये वैध* असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला . या निकालाचा फायदा राज्यातील *पात्र* पत्रकारांना होत असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी *बळवंत वालेकर* सरांचे जाहीर अभिनंदन केले .
*पासपोर्ट* कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात असावे असे केंद्र शासनाने ठरविल्यानंतर रायगड जिल्ह्याचे कार्यालय *अलिबाग या जिल्हा मुख्याललयात असावे* अशी लेखमाला बळवंत वालेकर यांनी सुरू केली.शिवाय जिल्हा परिषदेचा ठराव करून तो जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीसह ग्रुह मंत्रालय मुंबई येथे स्वतः पोचविला. त्यांनंतर तो प्रस्ताव केंद्रीय ग्रुह मंत्रालयाकडे जा ताच अलिबाग जिल्हा मुख्यालयात पासपोर्ट कार्यालयासाठी जागा पाहणी केंद्र शासनाकडून सुरू झाली . यावेळी विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांचे विशेष सहकार्य लाभले. आणि ते कार्यालय अलिबाग येथे चालू झाले.
*रायगड* जिल्ह्यासाठी असलेले
B. S. N, L. (दूरसंचार ) कार्यालय वांद्रा (मुंबई) येथे तर *जिल्हा कामगार न्यायालय* ठाणे येथील वागळे इस्टेटमध्ये होते .पत्रकार बळवंत वालेकर यांनी वार्तापत्रे लिहून , संबंधित मंत्र्यांच्या गाठी -भेटी घेऊन तसेच वार्ताहर परीषदेत प्रश्नांचा भडिमार सुरू केला. त्यावेळी रायगडचे सुपुत्र
*मनोहर जोशी मुख्यमंत्री* होते . त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर B. S.N. L, चे जिल्हा कार्यालय पनवेल येथे तर *जिल्हा कामगार न्यायालय* महाड येथे स्थलांतरित झाले. कामगार न्यायालय महाड येथे स्थलांतरित होताच तांत्रिक अडचणी निर्माण झारल्या. म्हणून हे न्यायालय जिल्हा मुख्यालयात सुरू होण्यासाठी बळवंत वालेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केला. गाठी -भेटीही घेतल्या.*निधी चौधरी* जिल्हाधिकारी असताना त्यांनी कलेक्टर कचेरीतील काही भाग कामगार न्यायालयासाठी देऊ केला. म्हणून अलिबाग येथे हे न्यायालय चालू झाले. हा वालेकर सरांच्या पत्रकारितेचा विजय आहे .
*म्रुत विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री निधीतून सहाय्य* – वरसोली येथील यात्रेत १९९९साली अनधिक्रुत फुगेवाल्याकडून स्फोट होऊन *शासकीय *मूक -बधिर* विद्यालय अलिबाग येथील दोन विद्यार्थी म्रुत झाले . म्रुत विद्यार्थ्यांच्या पालकांना मुख्यमंत्री निधीतून सहाय्य मिळण्यासाठी पत्रकार वालेकर सर धडपडले. प्रकरण विहीत नमुन्यात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंत्रालयात त्यांनी स्वतः पोचविले. .व तत्कालीन मुख्य मःत्री विलासराव देशमुख यांना भेटून सहाय्य मिळविण्यात ते यशस्वी झाले.
*शिक्षण क्षेत्रात आघाडी* – वालेकर सर पुणे विद्यापीठाचे बहिस्थ विद्यार्थी असून वयाच्या ४५ व्या वर्षी M. A. त्यानंतर B. Ed, झाले . को. ए. सो. च्या खरसुंडी (ता. खालापूर) येथील विना अनुदानित माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकपद सन १९९० -९१ मध्ये *Challenge* म्हणून स्वीकारले. तत्पूर्वी या शाळेचा S. S. C. चा निकाल ५ टक्के होता . योग्य नियोजन व अपार कष्ट घेऊन सतत तीन वर्षे शालांत परीक्षेचा निकाल ५५ टक्केच्या वर लावून *शाळा १०० टक्के* अनुदानावर आणली
ते *पोयनाड हायस्कूल* (विद्यमान ना. ना. पाटील हायस्कूल) मध्ये सहा., शिक्षक असताना को, ए. सो. च्या संचालक मंडळात शिक्षक प्रतिनिधी (Councjllor) म्हणून १९६९ ते १९७२ या कालाव धीत काम करण्याची सधी मिळाली. त्याचकाळात *को. ए. सो. सेवक सहकारी पतपेढी* स्थापन करून प्रथम चेआरमनपद भूषविण्याचा बहुमान मिळाला. तसेच *को. ए. सो. सेवक संघाची* स्थापना करून पहिले सेवक संमेलन पोयनाड हायस्कूलमध्ये मार्च १९७० मध्ये भरविले. या पहिल्या वहिल्या संमेलनाचे उद्घाटक *शिक्षक आमदार प्रमोद मोहाडीकर , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील तर स्वागताध्यक्ष को.. ए. सो. कौंसिलर बळवंत वालेकर होते. त्यांनी* को. ए. सो. नियतकालिक – *विकास* चे संपादकपद त्तब्बल १३ वर्षे भूषविले.

राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी पारतःत्र्यकाळात* स्थापन झालेल्या *अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे* ते विद्यमान अध्यक्ष आहेत . या मंडळाच्या नऊ अनुदानित प्राथमिकशाळा खेडोपाडी आहेत ही ग्रामीण भागातील संस्था शैक्षणिकद्रुष्ट्या प्रगत असून शासकीय शिष्यव्रुत्ती परीक्षेत विद्यार्थी शिष्यव्रुत्तीधारक बनण्याची परंपरा आहे . २०२४-२५ मध्ये या संस्थेच्या भाल प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रुद्र सुरेश पवार* शिष्यव्रुत्तीधारक बनला.पत्रकारितेत प्रवेश* – ४४ वर्षांपूर्वी पुणे येथील *दै. राष्ट्रतेज* ने रायगड जिल्हा प्रतिनिधीपदी वालेकर सर यांची नियुक्ती केली . त्यानंतर दै. महा-राष्ट्र* (पुणे) , *पुणे तरुणभारत* , *मुंबई तरुणभारत*, दै. लोकसत्ता* , *दै. आपला वार्ताहर* चे जिल्हा प्रतिनिधीत्व केल्यानंतर १९९५ च्या स्वातंत्र्य दिनी *सा. कुलाबावैभव* हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले. . गेल्या २७ वर्षांमध्ये *एकाही अंकाचा खंड न करता* शिवाय प्रतिवर्षी *दिवाळी* अंक प्रकाशित करून पत्रकारितेत वेगळा आदर्श निर्माण केला.

वालेकर सरांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील काम पाहून रायगड जिल्हा परिषदेने *रायगड भूषण*, रायगड जिल्हाङृ मराठी पत्रकार संघाने *रायगड पत्रभूषण* तर यादव चौली गवळी समाज ) या नोंदणीक्रुत संस्थेने *समाजभूषण* पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे . सरांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे