0
4
8
2
9
0
घन दाटून आले
ही धुंद नशीली हवा
हा धुंदावणारा गारवा
सरी पावसाच्या झेलता
वाटे तू सोबती हवा
धरा झेलते मोती
पावसात भिजते माती
अवखळ वाऱ्या संगती
लवते गवताची पाती
दूर रांग बगळ्यांची
झेप घेतांना आकाशी
घरट्यात पिल्ल्यापाशी
माय थांबते जराशी
येता सण आषाढी चा
घन दाटून आले नभी
झोका उंच आठवणीत
प्रिया उंबरठ्यात उभी
सविता धमगाये
ता.जिल्हा नागपूर
=============
0
4
8
2
9
0



