
0
4
8
2
8
4
फुले सावित्रीबाई
शिक्षणाची ज्योती शोभे
फुले सावित्रीबाई,
केली,महान क्रांती
जगी वंदनीय,आई.
भयाण,अज्ञान अंधकारानें
पांगळे झाले होते, मन,
पाशगुलामीचे तोडले
वर्मीच,घाव घालून.
किती झाले, जीवघेणे हल्ले
नाही कधी तीं, डगमगली
महिलांच्या, सन्माणासाठी
कर्मठ,चालीरीतीशी झुंजली.
मजबूत केले, मन मनगट
आत्मनिर्भर केले, आम्हाला,
ओळख स्वतःची, करून दिली
स्वाभिमानाचा, धडा दिला.
नष्ट केला, अन्याय अत्याचार
झाल्या आज,नारी सबला,
स्वकर्तृत्वाने, आकार देती
अपूर्ण राहिलेल्या,त्या स्वप्नाला.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
0
4
8
2
8
4



