ऋणगंधित मनाचा संवाद मनमोकळा… कृतज्ञता भाव आगळा: राजश्री ढाकणे
राजश्री मिसाळ ढाकणे बीड शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा

ऋणगंधित मनाचा संवाद मनमोकळा… कृतज्ञता भाव आगळा: राजश्री ढाकणे
“त्रिवेणी, काव्य, चित्र चारोळी
सर्वोत्कृष्टतेचा त्रिकोण छान
भाऊबीजेची ओवाळणी खास
शिलेदार परिवारात सन्मान..!”
मराठीचे शिलेदार समूहातील साप्ताहिक स्पर्धेत सोमवारीय त्रिवेणी काव्य, बुधवारीय काव्यरत्न आणि गुरूवारीय चित्र चारोळी तिन्ही स्पर्धेत सलग “सर्वोत्कृष्टतेचा जादूई त्रिकोण” सन्मानरूपाने जो मला लाभला आहे. कदाचित असा त्रिकोण कुठल्याही गणिताच्या पुस्तकात शोधूनही सापडणार नाही जो फक्त शिलेदार परिवारातच आहे. खरंतर आदरणीय राहुलदादांनी मला दिलेली भाऊबीजेची ही अनमोल भेट आहे असंच मला वाटलं.
तसं पाहिलं तर सणामुळे इतर कामामुळे मला लिहायला वेळच मिळेना अशी खंत मला स्वतः लाच वाटत आहे. पण कसाबसा वेळ जिथे मिळेल तिथे आणि जेव्हा मिळेल तेव्हा वाचन आणि लिखाणालाच देते. असा एखादा दिवस उगवतो की, कधी मावळला कळत देखील नाही. कारण जीवन प्रवासात रोजच सरळ मार्ग असेल असं नाही अचानक कुठं किती वेळ लागेल हे माहितीसुद्धा नसतं. आणि मग जे काम आवश्यक आहे म्हणजे करावंच लागेल ते आधी करावं लागतं आणि आवडीचे छंद तसेच हिरमुसले होऊन जणू माझी वाट बघतात कधी आम्हाला वेळ देते.
प्रत्येकाचं जीवन असंच थोडया फार फरकाने असेल यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे माझं रडगाणं बंद करून जो आनंदाचा क्षण लाभला, ज्यांच्यामुळे लाभला त्यांचे ऋणाभार व्यक्त करते. या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते माझी प्रिय सखी सविताबद्दल ते असं झालं की, मागच्या आठवड्यात जेव्हा स्पर्धा झाल्या त्यावेळी अशाच दोन्ही स्पर्धेत माझ्या रचना सर्वोत्कृष्ट म्हणून निवडल्या पण हॉस्पिटल आणि शाळाच्या कामात मी निकाल पाहून सुद्धा फोटो पाठवायचा विसरले पण, सविताने माझा फोटो दादाला पाठवला तिच्याकडे होता म्हणून आणि मला फोटो न पाठविणाऱ्यांच्या यादीपासून वाचवलं. “अशी असावी मैत्रीण” शेकडो कोस दूर राहून काळजी घेणारी.खरंच सवू तुझे खूप ऋणभार आहेत गं..!
मराठीचे शिलेदार परिवारात जो आनंद, कौतुकाचा वर्षाव, सन्मान मिळतो तो कुठेच मिळत नाही. अर्थात आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आदरणीय राहुलदादा आणि सर्व प्रशासक, सहप्रशासक, परीक्षक, संकलक, ग्राफिक्सकार यांची अहोरात्र मेहनत याची जाणीव आम्हाला आहे. खूप वेळा माझ्या लेखणीचा सन्मान करूनही मला ऋण व्यक्त करता आले नाही याची खंत सल मनाला आजही टोचते आहे. कृतज्ञता भाव अखंड असेल. शिलेदार परिवाराशी असलेले स्नेहबंध ऋणानुबंध हे कायम अतूट राहतील. वेळ नसला तरी स्पर्धा मात्र लेखणीला खेचून आणल्याशिवाय राहात नाही.
खूप कमी वेळात लिहिलेल्या रचना सुद्धा “सर्वोत्कृष्ट सन्मानाने” गौरविल्या जातात ते आनंदाचे क्षण लेखणीला दहा हत्तीचे बळ देणारे आणि मनाला आभाळ ठेंगणे वाटणारेच असतात. अशा अनंत आनंदाचे क्षण दिल्याबद्दल मी सर्व शिलेदार परिवाराची शतशः ऋणी आहे…!
ज्यांच्यामुळे मला सर्वोत्कृष्ट सन्मानाचा त्रिकोण लाभला, त्या सर्वांप्रति ऋणगंधित भाव माझे. सर्वप्रथम या शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा लाखो व्यक्तींना साहित्यिक बनवणारे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे, ध्येयवेडे आणि कुशल संस्थापक, संपादक, नावीन्यपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, देवांश म्हणजे आपले आ. राहुल दादा पाटील, सावली सारखी अहोरात्र साथ देणाऱ्या आ. सौ. पल्लवीताई, मुख्य प्रशासक /परीक्षक /कार्यकारी संपादक माझी सखी प्रिय सविता पाटील ठाकरे, आ. प्रशांत भाऊ ठाकरे,आ. विष्णुदादा, आ.संग्राम दादा, आ. अशोक दादा, आ.अरविंद दादा, प्रिय स्वाती , प्रिय वृंदाताई,शर्मिला ताई, तारकाताई, प्रतिमा ताई ‘साप्ताहिक साहित्यगंध’चे सर्व संपादक मंडळ अगदी सर्वांचे मनःपूर्वक ऋणयुक्त अनंत धन्यवाद. माझ्या लेखणीवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव करणारे, अर्थात लेखणीची ताकद /बळ असणाऱ्या शिलेदार परिवारातील सर्व आ. दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप ऋणयुक्त अनंत धन्यवाद…! सर्वांच्या साहित्यिक प्रवासास अभिनंदनीय शुभेच्छा…!!!
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा
©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह



