0
4
8
2
9
7
शर्यतीत मी
जीवनाच्या शर्यतीत रोजच धावते,
निराश होऊन कधी थांबते,
दुःखाला हरवण्या शक्ती खर्चते,
कधी सुखाच्या आनंदसरीत भिजते//1//
जपण्या स्वतःचे स्त्रीपण,
जखमी करते माझे मीपण,
राखण्या स्वतःचे अस्तित्व,
वेशीवर टांगते कधी तत्त्व//2//
झाले जरी तनमनाला घाव,
तरी माझे ध्येय मला ठाव,
मी पुन्हा पुन्हा खेळे डाव,
हे माझ्या ध्येयाचे गाव//3//
आले कितीही कठीण काम ,
तरी खंबीर उभी मी ठाम,
गाळणार मी कष्टाचा घाम,
विश्वासाने गाठेल परमधाम//4//
संघर्षाची शिदोरीही मी,
जगण्याची प्रेरणाही मी
शर्यतीत न संपणारी धावही मी
माझ्या स्वप्नांची विजेतीही मी//5//
उर्मिला राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर
======
0
4
8
2
9
7



