अड्याळ परिसरात लहान मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीसांचे आवाहन
अड्याळ परिसरात लहान मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीसांचे आवाहन
अड्याळ: भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अड्याळ परिसरातील लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
वास्तविक पोलीस दलामार्फत त्याची शहनिशा करण्यात आली मात्र ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे , अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अड्याळ पोलिस करीत आहे. लहान मुलांना पळवणारी टोळी असले बाबत जर कोणी जाणीवपूर्वक सदरची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याकरिता पोलीस दल सज्ज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचे सर्वतोपरी प्रयत्न अड्याळ पोलीस दलामार्फत केले जात आहे नागरिकांनी अशा स्वरूपाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
परिसरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती , संशयित व्यक्ती आढळल्यास तर तत्काळ पोलीस स्टेशन अड्याळ येथे संपर्क साधावा. स्वतः कायदा हातात घेऊ नये , असे आवाहन पोलिस स्टेशन अड्याळ मार्फत करण्यात येत आहे.