Breaking
आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे साखळी उपोषण

कुही तहसील कार्यालयाच्या छतावर चढून प्रशासनचे लक्ष वेधले

0 4 8 2 9 0

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे साखळी उपोषण

कुही तहसील कार्यालयाच्या छतावर चढून प्रशासनचे लक्ष वेधले

तालुका प्रतिनिधी भिवापूर/ मालेवाडा

भिवापूर: गेल्या अनेक वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत प्रलंबित मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त मोर्चे व आंदोलन करत आहेत. मात्र तरीही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मागील तीन दिवसांपासून कुही तहसील कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयाच्या दालनात बसून घोषणा बाजी केली.

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्त यांच्या तर्फे त्यांच्या प्रलंबित ११ प्रमुख मागण्यांसाठी गेल्या तीनl दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सौरव आंबोने व अशोक मारबते,हे तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करीत आहेत. मात्र शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र काही तरुणांनी नजर चुकवून तहसील कार्यालयाच्या छतावर चढून घोषणा बाजी केली.यामुळे तहसील कार्यालयाचे वातावरण चांगलेच तापले होते. इतर प्रकल्पग्रस्त छतावर चढण्याच्या प्रयत्नात असताना वेळीच कुहीचे पोलिस निरीक्षक भानुदास पिटुरकर व उपपोनी स्वप्निल गोपाले यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून प्रकल्पग्रस्तांना छतावर जाण्यापासून रोखले. शिवाय छतावर चढलेल्या लोकांना खाली उतरविले.

मात्र कितीही समजूत काढूनही आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने प्रशासनाची मोठी दमछाक झाली. विशेष म्हणजे कुही तहसीलदार अरविंद हिंगे हे एका बैठकीसाठी बाहेर गेले होते.तहसील कार्यालयातील सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी तहसील कार्यालयात पोहचून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे आंदोलनकर्त्यांनी धरणे व आंदोलन शांत करत आपल्या मागण्यांचे पत्र तहसीलदार अरविंद हिंगे यांना देण्यात आले. इतकेच नव्हे तर प्रकल्पग्रस्तांनी तहसीलदार हिंगे यांना तातडीने जिल्हाधिकारी यांच्या सोबत आमची तातडीची बैठक लावून द्यावी अन्यथा मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

यावेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्त्या इंजि सपना मेश्राम, आकाश भोयर, राजु मेश्राम, कृष्णा घोडेस्वार, निखिल धानोरकर, सुरेश आम्बोने, जगदीश बांते, रमेश ऊके,आकाश नरूले,शुभम खोब्रागडे, राजहंस माटे सह गोसाखुर्द प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे