वंदना सदानंद भगत यांचे दुःखद निधन
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: आवास गावातील लाडकं व्यक्तीमत्व वंदना सदानंद भगत यांचे रविवार दि. २५ अॉगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.१५ वाजता आवास येथे वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दुपारी ३.०० वाजता आवास [ भगत आळी ] येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी आवास [ भगत आळी ] येथे सकाळी ८.३० वाजता होणार आहे.
वंदना सदानंद भगत अतिशय मायाळू, प्रेमळ, सुस्वभावी व कष्टाळू होत्या. त्यांच्या निधनाने आवास गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांच्या आत्म्यास चिरःशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

