दसरा सण मोठा
वसुधा वैभव नाईक धनकवाडी, जि.पुणे
दसरा सण मोठा
दसरा हा सण हिंदू सणांपैकी महत्त्वाचा सण आहे. आश्विन शुद्ध दशमीला हा सण साजरा करतात. वाईटावर चांगल्याचा विजय,अधर्मावर धर्माचा विजय म्हणून हा सण साजरा करतात. नवरात्र उत्सव संपला की, देवीच्या नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसाच्या शेवटी पूर्ण जगभरात हा सण साजरा केला जातो. मोठ्या उत्साहाने फासा आणि साजरा केला जातो आणि यालाच आपण विजया दशमी असे म्हणतो. हा शुभ दिवस म्हणून मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी त्यातला हा एक दिवस महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो.
वाईटाचा नाश करण्यासाठी पश्चिम भारतात रावणाचे दहन केले जाते. प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला. श्रीरामाने रावणाला खल्लास केले. वाईट शक्तींचा विनाश केला. वाईट आवर चांगल्याचा विजय झाला म्हणून, ‘विजयादशमी’ असे म्हटले जाते. विजयादशमीला दुसरे नाव ‘दसरा’ हे आहे. या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता. राक्षसी प्रवृत्तीला आळा घातला होता. राक्षसी प्रवृत्तीचा विनाश केला होता. अधर्मावर धर्माचा विजय झाला होता. याच दिवशी व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी म्हणून शमीची देखील पूजा केली जाते. प्रत्येक घरोघरी धन,ज्ञान,भक्ती, यांची पूजा केली जाते. याचेच प्रत्येक म्हणून सोने वाटले जाते. सोने म्हणजेच काय तर आपट्याची पाने एकमेकांना देऊन प्रेमाने आलिंगन दिले जाते. राग,द्वेष सोडले जातात.
या दिवशी शाळा शाळांमधून दसऱ्याच्या धरतीवर खांडे नवमी साजरी केली जाते. शालेय साहित्याचे पूजन केले जाते. वैज्ञानिक साहित्याचे पूजन केले जाते. क्रीडा साहित्याचे पूजन केले जाते. घराघरात देखील शस्त्रांची पूजा केली जाते. अवजारांची पूजा केली जाते.मुलांच्या शालेय साहित्याचे पूजन केले जाते. गोडाचे जेवण बनवले जाते. सर्व आनंदी असतात. ‘दसरा सणा मोठा, नाही आनंदा तोटा..’
वसुधा वैभव नाईक
धनकवाडी, जि.पुणे
=====



