0
4
8
2
9
0
प्रश्नच पडला..?
तुला सांगावे तरी कसे
या मनाला प्रश्नच पडला?
शब्दांची गुंफण करु कशी
जणू कल्पनेचा मार्गच अडला
तुझा सहवास जणू सावली
तू कधी आभाळमाया होतो
तुझ्या हास्यात लपलेला सागर
मला पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो…
तुला सांगायचे आहे खरे,
पण धडधड वाढते हृदयाची
शब्दांमधून वाहते गुपित
भीती मला तुला गमवायची…
मनाच्या या कोपऱ्यात,
अजूनही प्रश्नच आहे उभा
घेशील समजून भावना
प्रश्नच करशील मला पुन्हा…
भावनांचे हे अवघड वळण
प्रश्नांमध्येच राहते कधी
उत्तर सापडेल कदाचित
प्रश्नाची सोबतच जीवन साथी…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
=========
0
4
8
2
9
0



