0
4
8
2
9
0
चला चला रोवणीला
श्रीमंत शेतकरी करती घाई
म्हणती चला लगबगीने बाई
बिगी बिगी नको करा घाई
चला चला रोवणीला ताई
खरीप हंगामात लावू धान
साडी खोसती कमरेला
बांधुनी डोक्यावर रुमाल
त्यावर हातभर सदरा दिसाला
शेतकरी दाखवित शिवार
बांधावरून निघाल्या पार
बाईनी घातले चिखलात पाय
उत्साह धान लागवडीला
चिखलात रोवणी करती
पाय घटृ जमिनीवरती
हात भरभर चालविती
बाता तोंडाच्या करती
दुपारी शिदोरी खाऊन पुन्हा
कामाला लगबगीने लागुन
संध्या पाखरांची किलबिलाट
आटोपून बाई जाती घराला
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
0
4
8
2
9
0



