Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरमुंबईराजकियविदर्भ

महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणारा सकारात्मक व लोकाभिमुख अर्थसंकल्प : अर्चना डेहनकर

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 1 6 5 2

 सक्षमीकरणावर भर देणारा सकारात्मक व लोमहिलांच्याकाभिमुख अर्थसंकल्प : अर्चना डेहनकर

नागपूर शहर प्रतिनिधी

नागपूर: महाराष्ट्र शासनाने सादर केलेला २०२६–२७ चा राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी, युवा आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणारा सकारात्मक व लोकाभिमुख अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया अर्चना डेहनकर यांनी व्यक्त केली.

या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना, शेतीसाठी आवश्यक सुविधा, तसेच ग्रामीण विकासाला चालना देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठीही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत.

तसेच युवांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यावर सरकारने विशेष भर दिला आहे. या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास अर्चना डेहनकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राची संत, समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांची परंपरा ही राज्याची मोठी ताकद आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून विकासाच्या योजना राबवण्याचा सरकारचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. या माध्यमातून समाजात समता, स्वच्छता, सामाजिक न्याय आणि विकासाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास अर्चना डेहनकर यांनी व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

-अर्चना डेहनकर पूर्व महापौर. महाराष्ट्र भाजपा सचिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे