Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती व विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात

सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्थेद्वारे उपक्रमाचे आयोजन

0 6 0 4 6 1

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती व विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात

सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्थेद्वारे उपक्रमाचे आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर, ता. ३० : विदर्भ हिंदी साहित्य संमेलन,नागपूर येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती तसेच विद्यार्थी सत्कार समारंभ विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी अनिल खडसे उपायुक्त आयकर विभाग भारत सरकार, चंद्राइस फाउंडेशनच्या संचालिका सुचिता कांबळे, प्रा. डॉ. जयंत गणवीर संचालक पिरॅमिड इन्स्टिट्यूट ,आर डी आत्राम सह आयुक्त ,समाज कल्याण विभाग (से.नि.) प्रेमकुमार गजभारे अध्यक्ष विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघ मर्या., अमोल भामरे आकाश इन्स्टिट्यूट, प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. निखिल डोंगरे यांच्यासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिलीत. आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी प्रा.डॉ. जयंत गणवीर पिरॅमिड इन्स्टिट्यूट यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध शैक्षणिक व करिअरच्या संधींची माहिती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांना दिली. अमोल भामरे (आकाश इन्स्टिट्यूट) यांनी JEE व NEET परीक्षांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या उपलब्ध संधी, अभ्यासाचे नियोजन आणि करिअरच्या विविध पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. निखिल डोंगरे यांनी प्रभावीपणे अभ्यास कसा करायचा आणि अभ्यास करताना टाळ्याच्या बाबी याबद्दल विस्तृत माहिती दिली. सुचेता कांबळे यांनी संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांचा आढावा उपस्थितांसमोर मांडून संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

आर. डी. आत्राम यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला शुभेच्छा देत भविष्यातही असेच उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. आयकर विभागाचे सहआयुक्त अनिल खडसे यांनी त्यांचे छोटे गाव ते यूपीएससी पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविलेल्या यशाचा अनुभव कथन करत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत आणि सातत्य ठेवण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
प्रेमकुमार गजभारे यांनीही संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय तायवाडे यांनी उपस्थित मान्यवरांद्वारे दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून संस्थेचे कार्य अशाच प्रकारे जोमात ठेवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमादरम्यान सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांचे जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांतून महापुरुषांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दर्शन प्रेक्षकांसमोर घडविण्यात आले. विशेष आकर्षण ठरलेल्या नाट्यछटेत सिद्धेश्वर नगर परिसरातील अनाथ मुलींच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे चित्रण करण्यात आले. झोपडपट्टीतील प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत व्हीसीएच्या क्रिकेट संघात अंडर-१५ गटात निवड होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रभावीपणे सादर करण्यात आला. या हृदयस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

या मुलींच्या संघर्षाची दखल घेत कार्यक्रमस्थळीच संस्थेकडून क्रिकेट युनिफॉर्म देण्यात आला तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या शिक्षण व भविष्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली. त्यामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श या कार्यक्रमातून पुढे आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित वाघमारे आणि मनीषकुमार अडागळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.मिलिंद घाटे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष गोपाल वानखेडे सोबतच प्रकाश तायवाडे, राजेश वानखेडे, संतोष नुपनारायण, दीपक सरनाईक ,उल्हास वानखेडे, सुभाष खंडाळ, राजेश गायकवाड , दीपिका अडागळे, संध्या अडागळे, वर्षा वानखेडे ,शारदा वानखेडे, प्रिया बावणे ,स्वाती वाघमारे , वैष्णवी साने ,यथार्थ अडागळे ,गौरी बावणे ,सौम्या अडागळे ,सानवी बावणे इशिका बावणे यांनी विशेष प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 6 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे