*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सोळा🎗🎗🎗*
*☄विषय : चक्रव्यूह☄*
*🍂शनिवार : २६/ ०७ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चक्रव्यूह*
आज मी डोळ्यांनी पाहिली
विश्वासाची हत्या होतांना
चक्रव्यूह रचूनी मजला
त्यात पुरती फसवतांना
किती कट कारस्थानांनी
माझं अस्तित्व मिटवतांना
पोखरणाऱ्या भूंग्यांकडून
लिलाव माणूसकीचा होतांना
मन मोकळं करून सोडू पाहे
माझ्या कुंठलेल्या शब्दांना
माझा आकांत अन् व्यथेची
ललकारी कुणीच ऐकेना
दाबला हुंदका तरीही लाट
हुंदक्याची मनात दाटतांना
भरून आलेलं आभाळ रितं
होऊनी डोळ्यातून सांडतांना
अग्नीपरीक्षा देता देता इथे
दिसे माझी व्यथा जळतांना
भावनांशी खेळ खेळून सारी
शिशिरातली पानं गळतांना
शिशिरातली पानं गळतांना
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
कुल्फी वितळून जावी
तसे निघून गेले लडिवाळ बालपण
गेला गुन्या गोविंदाचा काळ
आता तरणाबांड मी…
या युगाचा स्पर्धक मी
प्रगतीचे व्युह भेदणार
जोडले विज्ञानाशी नाते
फिरताहेत प्रगतीची चाके
त्या चाकावर होऊन स्वार
हा मी चक्रव्यूह भेदणार…
न थकता न थांबता राबलो
प्राप्त केली सुखवस्तू स्थिती
बांधला बंगला, उंच- उंच इमारती
घातली आकाशास गवसणी
ग्रहांचीही केली वारी..
वाटले प्रगतीला बटीक बनवू
कळले नाही भेदता चक्रव्युह
गुलाम प्रगतीचा झालो
गुलाम सुख वस्तूचा झालो
लालसे पायी फक्त यंत्रवत उरलो
कळली जेव्हा खऱ्या सुखाची व्याख्या
पुरता चक्रव्यूहात अडकलो
यंत्र युगाची नांदी ही ..
व्यूहरचनाच तशीही…
उमटती पडसाद…
लागली न सुखाची झोप कधीही
आरोग्य ही गमावून बसलो
गमावून बसलो.. सुख समाधान
शांती आणि मनशांती ही..
चक्रव्यूह भेदण्यास निघालो…
पुरता अभिमन्यू झालो.. अभिमन्यू झालो …
*सौ सुरेखा कोरे, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
संसाराच्या चक्रव्यूहात
माणुस जातो अडकून
मार्ग मिळत नसतो
तिथेच असतो फसून
जिवन तर जगत असतो
पण विचारात असतो गुंतून
शोधत असतो योग्य मार्ग
मिळत नसतो कुठून,,,,,
संसार मोहमायाचा बाजार
लागला असतो जिवनभर आजार
बंधनात जातो अडकून
काढत नसतो त्यांना हृदयातून
त्या नात्याची ग्रहण खोली
वाढत जातो लांब दूर
घर संसार मुले बाळे पत्नी
हे तर डोईजड होतात भरपूर
ही दुनियादारी फसवेगिरी
ह्या चकरव्यहाचा फासा मोठा
लालच स्वार्थ अहंकार
ह्यात माणुस होत जातो खोटा
विवेक बुध्दीने मिळतो मार्ग
असावा मनावर नियंत्रण
ईच्छा अकांक्षाचा करून त्याग
साधे पणाने जगावे जिवन
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्युह*
नजरेत येणारा माणूस
दिसतो सदा चक्रव्यूहात.
बदलत जातात चक्रव्यूह
आम्हा सर्वांच्या जीवनात.
कोणी गुंततो चक्रव्यूहात
संपत्ती मिळविण्याच्या,
कोणी सापडतो फेऱ्यात
सगेसोयर्यांच्या नात्याच्या.
कुणाला असतो चक्रव्यूह
कर्जबाजारी होण्याचा,
कोणी विचार करत असतो
मुलाबाळांच्या भविष्याचा.
कोणी त्रस्त रोगराईने,
आरोग्य साथ देत नाही.
औषधांचा चक्रव्यूह तो
कधीही तुटता तुटत नाही.
कुणाला असते चिंता
मुलबाळ नसण्याची,
कुणाकडे नसते कुवत
मुलाबाळांना पोसण्याची.
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
या कैचनी डांबले
संभ्रमात सापडले
दैत भुतांचा कचाटा
भयाने उभारला काटा //
तटबंदी हे चक्रव्यूह
अडकविला नरदेह
आडमुठी दाह फासा
सांग मज तोडू कसा //
चक्राकार फिरी भूमंडळ
लोचनाचे काळवंटी वर्तुळ
कडेकोट ग्रहण आपत्तीचे
आटोकाट प्रयत्ने सोडवाचे //
काचखळग्यातुन तारलो
अक्राळविक्राळातुन तरलो
संत अवतारी दावी सन्मार्ग भला
जिवनी सत्य कास धरू चला //
आईच्या कुशीतुन
शिकला अभिमन्यू
धाडशी तपस्वी देवर्षी
तुडवी जाचक प्रलयू //
*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी
निसर्गाच्या चक्रव्यूहात अडतं जातो
कधी झाडावर, तर कधी आडावर
बाप माझा स्वतःला गाडतं जातो….
चार एकर, दहा एकराचा मालक
एका – अर्ध्यावर परिवार पोसतो
तूप रोटी एकेकाळी खाणारा बाप
आंबील, चटणी – भाकरीवर येतो….
ऐटीत मिरवणारा माझा बाप
फाटक्या, तुटक्यावर भागवतो
येईलचं तो दिवस परत पुन्हा
नुसत्या खोट्या आशेवरच जगतो….
नाही कधी मी श्रीमंत होणार
माहितेय मला गरिबीतच मरायचे
पण का देवा असे आयुष्य दिलास
त्याचं गिरीबांसमोर भीक मागायचे….
आयुष्याच्या या चक्रव्यूहातून
बाहेर पडणे जमणार का मला?
प्रश्नाचा उत्तर मिळतो पाच वर्षानंतर
तोवरी असतो बाप जमिनीत गाडला….
*पु. ना. कोटरंगे*
*ता सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चक्रव्यूह…*
चक्रव्यूहाच्या जाळ्यात अडकलं
आयुष्य गुंतागुंतीचं होऊन बसलं
खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करता
जगण्याचं सूत्रचं साऱ्याचं फसलं..
धर्म, जातीचं करून राजकारण
सर्वसामान्यांनाच्या मनी दहशत
करून चक्रव्यूहाची फसवी रचना
मोडून काढावी आपण शतप्रतिशत..
बाहेरून दिसतं सगळं निटनेटकं
मनबुद्धीचे सारे एकांती आक्रंदन
योजनांच्या नावाखाली फसवेगिरी
गोड आश्वासनांचे लावले जाते चंदन..
शिक्षणसंस्थेचा मांडून बसला बाजार
पदव्या, संस्कारांना राहिलेच नाही मोल
स्वार्थी मनं, फसव्या आदर्शाचे ओझे
सचोटीचे माणुसपण बुडाले गेले खोल..
कलयुगाचे चक्रव्यूह हे भयंकर शापीत
कोणता अवतार सहजासहजी तोडेल?
समाजाचे बांधलेले हात कायद्याने
कोण सज्जन तो साखळदंड मोडेल…
*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव – रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
चक्रव्यूहांचे सर्वत्र कसे पसरले जाळे
सोडवणारेच फसलेत कसे पसरले जाळे..!
नियती देते संधी सुटण्याची चक्रव्यूहातून
संधीनेच नाकारलेत कसे पसरले जाळे..!
इमानदारीही अडकली बेइमानीच्या चक्रव्यूहात
बेइमानीने इमानदारीवर कसे पसरले जाळे..!
भ्रष्टाचाराला आले कसे सुगीचे दिवस
भ्रष्टाचाराने “सुगीवरच” कसे पसरले जाळे..!
नव्हतीच कधी तक्रार सुखाला दू:खाकडून
दु:खानेच सुखावर कसे पसरले जाळे..!
थेंबा-थेंबाने तळे तेंव्हा भरले जायचे
पडलेल्या भगदाडाने थेंबांवर कसे पसरले जाळे..!
चक्रव्यूह तोडेल “कृष्णच” एक दिवस
नाही म्हणणार कुणी “त्याचे” कसे पसरले जाळे..!
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*©️ सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
क्रांतीची बीजे रुजवुनी
पेटविला दीपक ज्ञानाचा
क्रांतीसूर्य-ज्योतीनी भेदला
चक्रव्यूह तो जातीभेदाचा
शुद्रादिकांच्या शिक्षणासाठी
चंदनासमची देह झिजवला
घातली ना भीक ज्योतीनी
सनातन्यांच्या गुलामगिरीला
खंत मुलींच्या शिक्षणाची
ओढले आसूड परिवर्तनाचे
घालून साद ती बहुजनांना
उघडले दार पुण्यात ज्ञानाचे
क्रांतीसुर्याच्या क्रांतीकार्याची
ज्योत सावित्रीबाई झाली
शेणचिखल दगडधोंड्यांच्या
चक्रव्यूहास सामोरी गेली
एकदिलाची व एकजुटीची
जाऊ द्यावी ना शक्ती व्यर्थ
चक्रव्यूह भेदण्यासाठी देऊ
विचारांना विचारांचे सामर्थ्य
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
येता जन्माला..मृत्यूपर्यंतच्या या प्रवासात अनेक संकट येतात
अन अडकतो माणूस या जीवनाच्या चक्रव्यूहात
पावलागणिक येतात अडथळे अन संघर्ष ही करावा लागतो
त्यात वाट काढायला जाताना त्यातच तो पुन्हा गुंततो..
कधी वाटते हा नियतीचा फेरा की खेळ आपल्या नशिबाचा
कष्टाला घेऊन सोबत प्रयत्न करतो तो चक्रव्यूह भेदायचा..
होते आठवण अभिमन्यूच्या त्या जिद्द अन धाडसाची
मग संचारते बळ अंगी संकटाशी दोन हात करायची
कधी अवघड कधी सोपं अशी गणित सोडवत पुढे चालतच राहावंसं वाटतं
अखेर या सर्वांवर विजय मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होतं
*सौ अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
चक्रव्यूह हे व्यसनाचे, फसवी मन युवकांचे.
जीवन इथेच संपून जाई काही नसे ध्येयाचे.!१!
पहिला घोट दारूचा, क्षणभर देई आनंद
सुखी संसारास करी हळूवार गिळंकृत.!२!
सिगारचा पांढरा धूर, फुफ्फुसांना जाळी.
आमंत्रण कॅन्सरला ,जीवन क्षणात उधळी.!३!
गुटखा आणि तंबाखू, ओठांवरची लाली,
तोंडात फोड उठती, आयुष्य होते काळी.!४!
ब्राऊन शुगरचे जाळे , शरीराला पोखरते,
नशा क्षणभंगुर, पण जीवन बरबाद करते.!५!
पैसा व आरोग्य जाई, कुटुंबीयही रडती,
चक्रव्युहात अडकता,बाहेर कसे पडती?.
!६!
हातापायास कंप सुटे, मन हे सैरावैरा पळे,
काहीच न सुचता, फक्त व्यसनच आठवे.!७!
नका अडकू चक्रव्यूहात हे फक्त फसवी
व्यसनातून निघा,जीवन तुम्हा खुणवी!८!
मित्रांना तुम्हीच सांगा, दूर व्हा यापासून,
निरोगी जीवन जगा आता या क्षणापासून.!९!
चक्रव्यूह हे व्यसनाचे, तोडा हे बंधन आजच.
सुंदर जीवन जगा,नवी पहाट येईल रोजच.!१०!
*प्राजक्ता खांडेकर*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*©सुगत नगर नागपूर*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
चक्रव्यूह आखू दे कितीही कोणी
बाहेर पडण्याचे बळ येऊ दे मनी
करावा प्रतिकार जाच जुलमाचा
पिंड नसावा अन्याय सोसण्याचा
दाखव तुझ्यात असलेले सामर्थ्य
जाणून घे चक्रव्यूहाचा अन्वयार्थ
नको बळी पडू कधी अमिषाला
गहाण ठेवू नको तुझ्या क्षमतेला
तुजसाठी रचलेले कट कारस्थान
असावे तू सदासर्वकाळ सावधान
गाफील राहू नको विश्वास ठेवून
जातील ते शत्रू तुझा घात करून
घे अंदाज नेहमीच शत्रूचा ध्यानी
रचलेले डावपेच ओळखावे मनी
सामर्थ्य आहे चक्रव्यूह भेदण्याचे
अनंत संकटावर प्रहार करण्याचे
*बी एस गायकवाड*
*पालम ,परभणी*
*©सदस्य ,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
मला लिहायची नेहमीच घाई
शब्दांच्या चक्रव्यूहात अडकतो
ते लिहितात तोलून मापून
त्यांचा झेंडा समूहात फडकतो
नाही केले कधी वाचन
अलंकाराचे ज्ञानही नाही
पालथ्या घड्यावर पाणी
मग उगाच वाहत राही
एक ना भाराभर चिंध्या
याला रचना म्हणत नाही
पण कोण सांगेल शहाणपण
हा म्हातारा कोणाचेच ऐकत नाही
शब्दांचे चक्रव्यूह भेदाया
सतत करावा लागतो अभ्यास
नवनवीन कविता, लेख
याचा असावा लागतो ध्यास
कितीदा समजावतो मनाला
विचारपूर्वक मी लिहावे
काय द्यायचा आहे संदेश
लोकांना तरी कळावे
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
अशांत आहे मन माझे जरा
शब्दांचा मनी फुलला पिसारा
शब्दांनीच या घात केला खरा
तरी शब्दांचाच पहा बर तोरा….
अती विचारांचे बाई काहूर
माजले की माझ्याच मनात
सजना साथ देशील का रे मला
सांगू का रे मी तुझ्या कानात….
मनात माजलय काहूर शब्दांचं
अफाट पसरलंय विस्तृत रान
या शब्दांना जीवनात, जगात
आहे भलताच मान आणि सन्मान….
शब्द शब्दांशीच कसे आता
भलतेच रुसू,फुगू लागलेत
मग काय शब्दांच्या बागेत
टम्म गाल फुगून बसलेत….
रुसवा कसा काढावा यांचा
या रुसलेल्या शब्दांचा बरं
शांत कस करु या शब्दांना
लाडीगोडी लावूया तर खरं…..
शब्द पण विचारात पडले
त्यांच्या मनी चलबिचल झाले
बैचैन होऊन सर्व शब्द आता
माझ्याशी गप्पा मारू लागले….
आले रे आले शब्द सजना
आता माझ्या परत भेटीला
हसतील, नाचतील,बागडतील
आनंद देतील माझ्या मनाला…
रुसवा जाईल खरे शब्दांचा
बागेतही रमायला लागतील
माझ्या मनाच्या हिंदोळ्यावर
मनसोक्त खेळत राहतील….
इथे चक्रव्युहात अडकलेले शब्द
अलगद गुंत्यातून ते सोडवले
तुझ्याशी बोलते करण्यासाठी
शब्दांच्या राज्यात रममाण झाले..
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्यूह*
कळले ना मला कधी
कशी अडकले प्रेमफासात
गोड बोलणे मधूर वाणी
शब्द शब्द भरला श्वासात
त्या शब्दांवर भुलून बाई
सोडले घरदार बाबा आई
पट्टी आंधळी डोळ्यावरची
किती समजावून सांगे ताई
धुंदी चे ते दिवस सरले
कटू अनुभव समोर आले
महाल वाडा सुटला मागे
सारे होते नव्हत्याचे झाले
स्वप्न पाहीले होईन राणी
बघा कर्माने झाले नोकराणी
रोज रोजच्या कलहाने मग
मुढ मौन झाली शुद्ध वाणी
असा रचला चक्रव्यूह सारा
निघण्यास दिसेना मार्ग बरा
मुक रडते हसते बावरते
मृग नक्षत्रास बरसती धारा
*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
*चक्रव्युह*
समस्येच्या चक्रव्युहात
वेढलेली होती ती त्रस्त
एकमेव ही तिच्याजवळ
आत्मविश्वासाची दौलत
आपलेच झाले गनिम
रचला त्यांनी चक्रव्युह
मानली ना तिने हार
दिली टक्कर कसून
वैधव्य आले जीवनी
दोन मुलांचा सांभाळ
सगे सोयरे हसून तिची
पाहत होते आबाळ
पेटून उठली जिद्दीने
स्वाभिमानी तिचे मन
हाडाची काडं करून
दिले मुलांना शिक्षण
धैर्य आणि संयमाने
केली संकटांवर मात
आपल्या दोन मुलांना
बनवले कणखर जीवनात
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✳️🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
ऐ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



