0
4
8
2
9
7
सावित्रीचा प्रश्न
आपल्या सावित्री माऊलीने
रोज जरी घेतला जन्म,
तरीही बदलणार नाहीत
आपल्या स्त्रियांचेच नियम.
शिक्षण हातात घेऊनही
उंबरठ्यावरच थांबले पाय,
घरच्या जबाबदारीच्या नावाखाली
स्वप्नांची होतेच हायहाय.
शिकूनसुद्धा असह्य वेदना,
गुलामगिरीचे अदृश्य जाळे,
संधी असूनही विचारात अडकून
स्वतःचेच तोडते पंखाळे.
मग काय उपयोग सावित्री,
तुझे शतशः येऊन जाणे?
जेव्हा मनच कैदेत आहे,
तेव्हा मुक्ती कशी मिळणे?
हीच गोष्ट पदराला बांधून ठेव,
इतिहासाला दोष नको देणे,
प्रश्न जन्मांचा नाही इथे,
प्रश्न आहे स्वतःला ओळखणे.
डॉ राजेश काळे ‘राजस’
तालुका जिल्हा नागपूर
=========
0
4
8
2
9
7



