Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र

श्री स.भु.प्र. बालानगरचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 78.83%; मुलींनीच मारली बाजी

पद्माकर वाघरूळकर ईश्वर कसबे; प्रतिनिधी

0 5 5 6 4 6

श्री स.भु.प्र. बालानगरचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 78.83%; मुलींनीच मारली बाजी

पद्माकर वाघरूळकर
ईश्वर कसबे; प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

बालानगर दि.८ (प्रतिनिधी)- दहावी (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये पैठण तालुक्यातील श्री सरस्वती भुवन प्रशाला बालानगरचा निकाल 78.83% लागला.

परीक्षेस एकूण 137 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 108 विद्यार्थी उत्तीर्ण व 29 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्राविण्य 10, प्रथम श्रेणी 29, द्वितीय श्रेणी 37 आणि उत्तीर्ण श्रेणी 32 विद्यार्थी आहेत.

विशेष म्हणजे ही परीक्षा प्रशालेत कॉपीमुक्त व ताणतणावविरहीत वातावरणात घेण्यात आली होती. प्रशालेचा शेकडा निकाल 78.83% लागला आहे. त्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सर्वप्रथम- कु.प्रांजल संदीप राऊत 86.60%, सर्वद्वितीय- कु.सोनाली प्रल्हाद बोर्डे 82.80% आणि सर्वतृतीय- कु.श्रेया सारंगधर ढाकणे 80.60% आले आहेत.

मागासवर्गीय गुणवत्ता यादीत प्रशालेतून सर्वप्रथम-*कु.श्रेया सारंगधर ढाकणे 80.60%, सर्वद्वितीय- कु. वैष्णवी नरहरी मैंद 78% आणि सर्वतृतीय-कु.शितल पापालाल गल्हाटे 77.80% आले आहेत. यशस्वीतांमध्ये मुलींनीच बाजी मारलेली आहे.

परीक्षेतील गुणवंतांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, शालेय समितीच्या अध्यक्षांसह सर्व सदस्य, दहावीच्या वर्गशिक्षिका वैशाली कुंभकर्ण आणि सुमेधा साळवे तसेच प्रशालेतील सर्वच विद्यार्थी व शिक्षकशिक्षकेतर सहकाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 6 4 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे