
0
5
1
7
9
5
काव्य कळ्या
अक्षरामागे अक्षर
लागले शब्दासोबत जुळू
कंठातून शब्द आता
ओठावर यायले हळू
काय झाले कसे झाले
कळले नाही मला
ओठातल्या शब्दांचा
लागला मला लळा
शब्द चमत्कृतीने
सजू लागली साज
रचनात्मक रुपामुळे
आले साहित्याचे राज
शब्द कळ्यांना आला
बहर बहरले काव्यरूपी रान
गातो आम्ही मातृभाषेचे
या मराठीचे गुणगाण
जगदंबे विलास
गुजराती हायस्कूल, नांदेड
0
5
1
7
9
5



