
0
6
1
1
8
5
गावाकडची श्रीमंती
हिरवीगार आमराई
आंबे खाण्याची मजा
सुबत्ता सर्व गावाला
मनसोक्त लुटा मजा
येता दारी भिक्षुकरी
कोर कुटका मिळायचा
आशीर्वाद देत तो पुढे
आपला रस्ता धरायचा.
मिळून मिसळून राहायचे
गप्पा पिंपळाच्या पारावर
गावात कुठे काय घडलं
विचार व्हायचा त्यावर
कुणा घरचा कार्यक्रम
गाव समदे धाव घेई
अडीअडचणीला कधी
पैशाचीही मदत होई
लेक असो कुणाचीही
असे समद्या गावाची लेक
तिच्या संरक्षणाची हमी
विचार होते गावचे नेक
श्रीमती सुलोचना लडवे
जि अमरावती
=======
0
6
1
1
8
5



