0
4
8
2
9
0
सारथी
श्रीकृष्णासारखा सारथी
संपूर्ण विश्वाला हवा आता
हैवानांचा सुळसुळाट नित्य
नाही सुरक्षित बहीण माता…!!
अपयशी लोकशाही शासन
खून हत्या आणि बलात्कार
पुन्हा जन्मावा सारथी असा
लांडगे करावेत देहातून ठार…!!
वासनांधतेने गाठला कळस
कळेना नराधमाला बालिका
निर्दयी क्रूर निचपणा सर्वत्र
दुष्ट दैत्यांची सुरुच मालिका…!!
बोथट झाली संवेदनशीलता
कॅण्डल पेटवून साध्य काय
देशाची न्यायदेवता गांधारी
सत्य दिसून मिळेना न्याय…!!
विश्वपालनकर्ता बंधू पिता
पुन्हा श्रीकृष्ण अवतारावा
शीलरक्षक नारी जातीचा
धर्मरक्षक सारथी जन्मावा..!!
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
=============
0
4
8
2
9
0



