Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणे

रेग्युलस साऱ्याची भेट – अंतिम भाग

वसुधा वैभव नाईक, पुणे

0 4 8 2 9 0

रेग्युलस साऱ्याची भेट – अंतिम भाग

वसुधा वैभव नाईक, पुणे

डॉक्टर मधूसूदन घाणेकर यांचा ‘डहाळी’ हा अंक हस्तलिखित अनियतकालिक आहे. अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत. डॉक्टर घाणेकर यांना 500 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी सुमारे दहा हजार देश विदेशी यांना निरपेक्षपणे सन्मानित केले आहे. तेव्हा त्यांनी लहान, मोठे, जात – पात, प्रांत,देश- विदेश, प्रांत, वर्ण,पंथ शिक्षण, कोणता पक्षाचा आहे याचा कोणताही विचार केलेला नाही.

त्यांनी अनेक संस्था अनेकांना स्थापन दिलेले आहेत. नवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. साहित्य गौरव,महिला सन्मान, समर्पण, महिला ज्योतिर्विद्या, युवा विश्व, बाल गौरव, वर्ल्ड लीटरेचर, आंतरराष्ट्रीय एकपात्री परिषद, इत्यादी अनेक संस्था यांनी स्थापन केले आहेत. वंदन त्यांच्या कार्याला.

आत्मसात केलेले ज्ञान विश्वामुख करण्याचे सर्वाधिक देशातील योगदानासाठी डॉक्टर घाणेकर हे आता ‘विश्वगुरू ‘ह्या सर्वोच्च उपाधीनेही सन्मानित होत आहेत. दि. ७/१२/२०२४ रोजी ‘विश्वगुरू’ या उपाधीने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक संस्थांचा सहभाग आहे. पत्रकार भवन, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. वेळ १०.०० ते १.०० अशी आहे.तरी त्यांच्या ह्या सोहळ्याला आपण सर्वांनी नक्की यावे ही विनंती. कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

सौ. मेघना मधुसूदन घाणेकर या त्यांच्या पत्नी आहेत. यांनी देखील त्यांना नेहमीच उत्तम साथ दिली आहे. थोडक्यात त्यांच्या भर्याबद्दल.. 57 व्या वर्षी जिद्दीने B.A. ..यशस्वी झाल्या. दत्तोपासक स्व.ताई घाणेकर स्मृतिमंच याच्या त्या कार्याध्यक्ष आहेत. साहित्य गौरव याच्या त्या उपाध्यक्ष आहेत. हॅन्डरायटिंग ॲनॅलिसिस, रिसर्च फाऊंडेशन, युनिव्हर्सल अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल, फौंडेशनच्या त्या सचिव आहेत. महिला ज्योतिर्विदच्या माजी अध्यक्ष आहेत. साहित्य, संगीत, पाककला हस्तकला आदि क्षेत्रांचा व्यासंग
आहे. मेघना ताईंची उत्तम साथ लाभली त्यामुळे आज रेग्युलस तारा खरोखरच अती प्रकाशमान होत आहे. श्री. व सौ. घाणेकर यांना शतशः नमन

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे