सिर्सी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी महामानवास मानवंदना
नागपूर/सिर्सी : अखिल रोडे, प्रतिनिधी
सिर्सी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी महामानवास मानवंदना
प्रितम हाडके, वनमाला कांबळे यांच्या गीत गायनाने अभिवादन
यशवंत अंबागडे , संगीता गजभिये यांचे स्त्रीसशक्तीकरणावर वक्तृत्व
नागपूर/सिर्सी : अखिल रोडे, प्रतिनिधी
सिर्सी:- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिर्सी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बुद्ध विहार परीसरात गावातील सरपंच वंदनाताई बुटे व उपसरपंच अतुल नारनवरे , भोजराज ढोके , सुनिल शेंडे यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करत डॉ बाबासाहेबाना आदरांजली अर्पण केली.
प्रितम हाडके व वनमाला कांबळे यांनी अनंत राऊत यांच्या लेखणीतून उतरलेली कविता गायन करत वंदना वाहिली. पँथर यशवंत अंबागडे यांनी बाबासाहेबांचा स्मृतीला उजेडा देत श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या,अंधकारमय जीवनाला प्रज्ञनेचा संदेश कसा दिला हे समजाऊन सांगितले. संगीता गजभिये यांनी बाबासाहेबांचे प्रखर राष्ट्रप्रेम, सामाजिक क्रांती, स्त्री समान हक्कासाठी केलेली चळवळ याची आठवण करून दिली. संगीता ताई ने सांगितले स्त्रीयांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावे यासाठी अनेक चळवळी केल्या. स्त्रीयांची गुलामगिरीही त्यांनी दूर केली. श्रमजीवी, पत्रकार, शेतमजूर, कामगार, मजूर आदींच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
तसेच ग्रामपंचायत कार्यलय सिर्सी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून सरपंच, उपसरपंच व अंगणवाडी सेविका यांनी आदरांजली अर्पण केली. सायंकाळी भीम सैनिकांनी गावातील मुख्य रस्त्यावरून कँडल मार्च काढत अभिवादन केले.यावेळी यशवंत अंबागडे, प्रशांत भगत, रुपेश आंबुलकर ,रोशन सुटे,हृतिक सुटे,संजय मेंढे, उमेश कांबळे,यशवंत सुटे, अशोक जुंनघरे, गौतम जुंनघरे, सचिन मेंढे, प्रितम हाडके, योगेश भगत,राहुल मेंढे,विजय हाडके, धारा हाडके, कविता भगत, प्रशिका भगत, पंचशीला मुन,सुनंदा सुटे, वंदना अंबागडे,चैताली तामगाडगे, सरोज सुटे, पिंकी सुटे, नंदकिशोर पानबुडे (आम् आदमी आदमी पार्टी ), सुधाकर चुटे, संजय भुरे, मुकेश झाडे, सुरेश मेश्राम आदींनी बाबासाहेबांना अभिवादन केले.



