0
4
8
2
9
0
वर्तमान
भावना मनातील माझ्या
मनामध्येच जाळतो आहे
रक्तबंबाळ जखमा माझ्या
हृदयाशी कुरवाळतो आहे
नको असलेल्या नात्यांना
हल्ली मी टाळतो आहे
नव्या नात्यांना नव्यांने
पुन्हा मी माळतो आहे
फुकाचे बोलणे कुणाला
हल्ली मी टाळतो आहे
सत्य शब्द माझा कुणास
विस्तव होऊन पोळतो आहे
दिल्या जखमा ज्यांनी मला
हल्ली त्या मी उगाळतो आहे
नको ती माणसे मनाच्या
चाळनीतुन गाळतो आहे
वर्तमान माझा मला
नित्य रोज छेळतो आहे
भविष्याच्या भल्यासाठी
मी भूतकाळाला टाळतो आहे
प्रकाश पुंडलिक गोधने
ता. कंधार जि.नांदेड
0
4
8
2
9
0



