बाली इंडोनिशिया ट्रिप: भाग ३
वसुधा वैभव नाईक
बाली इंडोनिशिया ट्रिप: भाग ३
‘बाली इंडोनेशियाचा’ तिसरा दिवस दि.२/०४/२०२५ रिसाटा रिसॉर्टवर नाश्ता करून ठीक नऊ वाजता आम्ही हॉटेल सोडले. अस्तफा गाईड आणि गाडी दोन्ही आले होते. आज गाडीचा ड्रायव्हर बदलला होता. त्या ड्रायव्हरचं नाव होतं डे. आम्ही सर्व गाडीत बसलो व अस्तफाने शहराची माहिती द्यायला सुरुवात केली. प्रथम गुड मॉर्निंग इंडोनेशिया भाषेमध्ये सलामत पागी असे म्हणाला. सलामत सियाम हा देखील शब्द आहे. आज आम्ही उलून दानू या टेम्पल ला भेट देण्यासाठी निघालो. जाताना सि साईड सीन खूप सुंदर दिसत होते. शहराची माहिती देता देता अस्तफाने काही इंडोनशियन शब्दांची माहिती करून दिली. उदा :- पित्रा म्हणजे सिस्टर, पलानी म्हणजे इंद्रधनुष्य, सूर्य म्हणजे गुड इव्हिनिंग. अशा काही इंडोनेशियन शब्दांची भर आमच्या ज्ञानात पडली.
मध्येच पावसाने आपली चुणूक दाखवली. रस्त्याच्या दुतर्फ हिरवीगार झाडी पसरलेली होती. तसेच कोरीव लेणी असलेली दुकाने आढळली. तिथे जागोजागी राक्षसाच्या रूपात असलेल्या लेणी आहेत. त्याचबरोबर आणखी एक जाणवले की प्रत्येक घराच्या प्रत्येक हॉटेलच्या समोर जो काही पदार्थ घरात बनवला असेल त्याचा नैवेद्य दाखवलेला असायचा. काही बनवले नसेल तर चॉकलेट सुद्धा तिथे ठेवलेले असायचे. ते या निसर्ग शक्तींना खूप मानतात. त्याचबरोबर जरा अंधश्रद्धाळू लोक वाटली.पण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना थकत अजिबात नव्हते. आनंदाने नमस्कार करत होते. हे वेगळेपण पहायला मिळाले. ‘उलून दानू’ या मंदिराच्या परिसरामध्ये आलो. भव्य दिव्य परिसर. सुरेख फुलापानाने सजवलेला. हिरवाईने नटलेला.
कोरीव कामाने सजलेला. टिपिकल इंडोनेशियन वास्तूत असलेला हा देखावा बघून मन आनंदून गेले.
स्पेशल बाली ड्रेस घालून आम्ही विविध फोटो काढले. खूप खूप आनंद झाला. इन्स्टा साठी रील बनवले. ड्रेस तर घातले, पण तिथे अमेरिकन डॉलर चालेल ना की इंडियन रुपये चालेनात. शेवटी आमच्या गाईड करून आम्ही इंडोनेशियन करन्सी घेतली व तिथे दिली. हा एक अनुभव वेगळा आला. पण खूप मजा केली. बाटिक प्रिंट कसे केले जाते याचे निरीक्षण केले. त्या कारखान्याला भेट दिली. बाटिक प्रिंटच्या काही वस्तू आणि ड्रेस खरेदी केले. चांदीच्या छोट्या छोट्या वस्तू कशा बनवल्या जातात हे चांदीच्या कारखान्यात जाऊन पाहिले. भले मोठे चांदीचे दुकान तिथे होते. तेथून बऱ्याच दागिन्यांची खरेदी केली.
आज इंडोनेशियन फूड आणि टेस्ट केले. रात्री इंडियन रेस्टॉरंट मध्ये जेवण केले. आम्ही एकीकडे जेवत होतो व एकीकडे ऑर्केस्ट्रा चालू होता. आमच्या गाण्यांची फर्माईश त्याने पूर्ण केली. मस्त मंद प्रकाशात ऑर्केस्ट्रामध्ये आमचे उत्तम जेवण झाले. आज जेवणामध्ये विशेषतः बुंदीचा लाडू होता. जेवण करून आम्ही आमच्या रिसॉर्ट वरती रात्री दहा नंतर परतलो.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे



