
0
5
7
4
4
8
प्रेमाचा गुलकंद
प्रेमाचा गुलकंद
खुणावतो मजला
प्रेमातुर मयूर
अंतरंगी सजला
हृदयगाभारा भारी
उघडतो कवाडं
विराजमान होण्या
भुलवतो लबाड
प्रेमाचा गुलकंद
नशिल्या ओठांवर
प्रेमदास नाचतो
मदहोश बोटांवर
चांदण्या रे रातीला
अडकला जाळ्यात
गुलकंद चाखूनी
न्याहाळतो डोळ्यात
गुलकंदाची नशा
डोक्यात रे शिरली
मावळली निशा
मूर्ती हृदयी कोरली
संग्राम कुमठेकर
ता. जि.लातूर
=========
0
5
7
4
4
8



