सिर्सी येथे श्री विघ्नहर्ता श्रीराम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन
प्रतिनिधी, अखिल राजू रोडे

सिर्सी येथे श्री विघ्नहर्ता श्रीराम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन
प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगळवार, २४ मार्च ते शुक्रवार, २७ मार्च २०२६ या कालावधीत
प्रतिनिधी, अखिल राजू रोडे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
उमरेड / सिर्सी:( दि २३) तालुक्यातील सिर्सी येथे नवनिर्मित श्री विघ्नहर्ता श्रीराम मंदिरात श्रीराम प्रभू, माता सीता, लक्ष्मण, हनुमान, श्री गणेश आणि श्री संत गजानन महाराज यांच्या मूर्तींचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगळवार, २४ मार्च ते शुक्रवार, २७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. श्रीकांत नंदकिशोर मुंजे महाराज यांच्या शुभहस्ते हा विधी संपन्न होणार आहे.
भरगच्च धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
या चार दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:
२४ मार्च (मंगळवार): सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत श्रीराम मंदिर वास्तुपूजन होईल. रात्री ८ ते १० या वेळेत सोनामाता भजन मंडळ आणि नवदुर्गा भजन मंडळ, सिर्सी यांचा ‘नामसंकीर्तन’ कार्यक्रम होईल.
२५ मार्च (बुधवार): सकाळी १० ते ५ या वेळेत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. रात्री ८ ते १० या वेळेत रंगनाथ बाबा भजन मंडळ आणि संत तुकाराम भजन मंडळ, सिर्सी यांचे भजन होईल.
२६ मार्च (गुरुवार): सकाळी ६ ते २ या वेळेत अभिषेक व हवन होईल. सायंकाळी ६ ते १० या वेळेत मंदिरातून ‘भव्य श्रीराम शोभायात्रा’ काढण्यात येईल. या शोभायात्रेत श्रीराम प्रतिमा आणि विविध आकर्षक झाँकी (चित्ररथ) भाविकांचे मुख्य आकर्षण असणार आहेत.
२७ मार्च (शुक्रवार): दुपारी १२ वाजता ह.भ.प. श्री मोहन महाराज गंडाईत (हिंगणघाट) यांचे ‘काल्याचे कीर्तन’ होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भजन मंडळांचा सहभाग
या सोहळ्यानिमित्त आयोजित शोभायात्रेत सिर्सी येथील विविध भजन मंडळे जसे की, नवदुर्गा, सोनामाता, रंगनाथ बाबा, शिवशंकर, संत तुकाराम, श्री संत ज्ञानेश्वर भजन मंडळ तसेच जय लक्ष्मी बँड पार्टी आणि जय संतोषी माँ बँड पार्टी सहभागी होणार आहेत. या मंगलमयी सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन सिर्सी येथील समस्त ग्रामस्थ आणि मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



