
0
6
5
6
0
4
खारूताई
खारूताई खारूताई
नेहमीचीच तुझी घाई
दिवसभर फिरून तुला
कंटाळा कसा येत नाही
शेंगा अन् फळे
खातेस कुरूकुरू
शेपटीचा झुपका उडवत
चालतेस तुरूतुरू
खारूताई खारूताई
दिसतेस किती छान
शत्रूची चाहूल घेतेस
वाकडी करून मान
पाठीवर तुझ्या
काळे पांढरे पट्टे
आजी तर म्हणते
ही रामाची बोटे
सगळं काही खाऊन
एकटीच करते फस्त
चिंगीलाही दे ना गं
मजा येईल मस्त
भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता.उमरेड जि.नागपूर
=======
0
6
5
6
0
4



