मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : गडगडाट📘*
*🔸मंगळवार : १९ / ०८ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गडगडाट (बालकाव्य)*
उंच उंच आभाळात
ढग कुठून बरं चढले
चढताना काही मात्र
धपकन खाली पडले….
चढता येईना म्हणून
आईने त्यांना बदडले
मार खाऊन बिचारे
ढग मुळूमुळू रडले….
नदीचे बोट धरून ते
गुपचूप समुद्रात दडले
सूर्याशी मैत्री करून
ढग पुन्हा वरती चढले….
उंच उंच डोंगरावरच्या
झाडांनी त्यांना छेडले
रागाने ढग काळेकुट्ट
खूप खूप होते चिडले…
थंडगार वाऱ्यामुळे मात्र
ढगांनी केला गडगडाट
प्रकाश पसरला सर्वत्र
विजेचा सुरू कडकडाट…
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
*गडगडाट*(बालकाव्य)
काळे काळे ढग
दाटून आले वरवर,
कोसळतो पाऊस
जमिनीवर सरसर…
सांग ना ग आई
का आवाज करतो,
पावसात ढगांचाच
तो गडगडाट होतो…
पळतात घाई घाई
स्पर्धा त्यांची होई,
एकमेका आदळून
तो गडगडाट होई…
भीती वाटतेय मला
तो आवाजच ऐकून,
लखलखाट विजेचा
जातात ही चमकून…
चिंब पावसात मला
भिजायला आवडते,
ढगांचा तो गडगडाट
मला नकोसा वाटते…
तळे साचेल अंगणी
पावसाच्या पाण्याचे,
अंगावर उडवू पाणी
पाण्यातच पोहायचे…
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
*गडगडाट*
आकाशी काळे ढग जमती,
वीज चमकुनी नभा फाडती,
गडगड गडगड आवाज घुमे,
गडगडाट सर्वश्रेष्ठ ठरे।
चिमुकली पाखरे दडुनी बसती,
गंमत करून पाऊस हसती,
धाडसी गडगडाट जणुं राजा,
पावसाचा तो सखा खरा।
चांदोबा देखील लपूनि जाई,
तारे थोडे दुरून पाहती,
गडगडाटाचे धडधड हृदय,
निसर्गाचा तो ढोल मोठा।
पाऊस थेंब थेंब नाचू लागे,
झाडेफुले आनंद गावे,
गडगडाट सर्वश्रेष्ठ म्हणती सारे,
आकाशी वीरपण दाखवे तो रे।
*महेश पुरसों काणकोणकर*
*कालापूर बांध तिसवाडी गोवा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
*गडगडाट*
बघा आमचा आकाश
कसा भरला तुडुंब
तेवढा पाणी असून
पडतो खाली थेंब थेंब
काळे पांढरे ढग
एक मेक मागे धावती
ह्या स्पर्धे मध्ये दोघे
खाली वरती होती
थंड वाऱ्यांसोबत
होई मेघ गर्जना
कड कड गडगडाट आवाजाने
भय भीत करती सर्वांना
बाहेर पडणे मुश्किल
सारे व्यवहार ठप्प
धो धो पडायचा पाऊस
घरी सर्व चिडीचूप
आई म्हणायची मला
पोरा बाहेर नाही जायचं
खूप विजा चमकतात
आपण घरीच राहायचं
विजांचा तो लख लखाट
ढगांचा तो गडगडाट
धो धो पडायचा पाऊस
तेव्हा दिसत नसतो वाट
हा तर निसर्गाचा कोप
नाही करीत कुणाला माप
स्वतः स्वतःलाच सांभाळायचं
हेच निसर्गाचे रहस्य समजायचं
गडगडाटाने सारी दुनिया
भयभीत होऊन हादरतो
संकट नका ओढवू
म्हणून माणूस प्रार्थना करतो
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गडगडाट*
दिवस पावसाळ्याचे
उसंत कधि पाऊस देतो
कधि मोठ्या मेघगर्जनेचे
मुसळधार कधि बरसतो
ढगांचा गडगडाट मोठा
प्रकाशाचा वेगही जास्त
छातीत होते बघा धस्स
भिती वाटते आहे रास्त
झाडे वेली डोलतात
सोबत आहोत आम्ही
सदैव साक्ष देतात
डोंगर टेकडीवर
धडाड धुम आवाजाने
हादरते धरणी माता
ढगांच्या गडगडाटाने
फाटतात पाऊलवाटा
*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
*गडगडाट*
गुरुजी गुरुजी कसे झाले
आकाशी ढग दाटले
सूर्य तो सखा आमुचा
तया सांगा कोणी लपवले
अनामिक भीती मनामध्ये
आईची येते आठवण
ढग कसे हे अधांतरी
काळ्या पोत्यांची ही वळचन
नका घाबरू बाळांनो
घेऊ मजा पावसाची
सर्वजण वर्गामध्ये बसू
सुरक्षा ही बाजू जमेची
थंड ढगांना उष्ण ढगांचा
होतो जेव्हा आघात
वीज निर्मिती होते तयातून
होतो ढगांचा गडगडाट
ही किमया निसर्गाची
बाब आहे आनंदाची
हवा सांगून जाते गुज
आनंदवार्ता ती पावसाची
खिडकी मधून पाहू गंमत
विजांचा तो लखलखाट
धावपळ होते ढगांची
अन् थेंबांचा थयथयाट
घ्यावा आडोसा घरामध्ये
झाडे इमारती ठरती घातक
घेता काळजी स्वतःची
मग आनंदाला काय बाधक
सरसर सरसर सरी येती
वादळ वाऱ्याची गडबड नुसती
पहा तुषार हे कसे उडती
डोहांमध्ये थेंब नाचती
मजा घ्यावी जीवनाची
कारणे जाणून घ्या विज्ञानाची
भीती नको पुन्हा कशाची
हीच शिकवण निसर्गाची
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
*गडगडाट*
गडगडाट झाला ढगात
चमचम वीज चमकली
वेगवान वादळ सुटले
पावसाची सर आली
पाणीच पाणी चौफेर
नदी,नाले दुथडी भरले
ओहळ नाले एक झाले
नदीचे पाणी वाढत गेले
शाळाही सुटली लवकर
मुले धावत घरी परतली
सोन्या अडकला पावसात
आई चिंता करू लागली
अमित शेतातून येत होता
सोन्या त्याला रडत दिसला
अमितने केली त्याला मदत
सोन्याला घरी घेऊन गेला
गडगडाट होतच राहिला
पावसाला मग वेग आला
पेरणी कशी करावी चिंतेने
बळीराजा पण घाबरला
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️
*गडगडाट*
सर सर सरी पाऊस पडतोय रे
रिमझिम रिमझिम नाद करतोय रे ।।
काळे काळे ढग गगनात आले
गडगड आवाज करायला लागले
वीजांचा नाच सुरू झालाय रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।१।।
उनाड वारा सू सू वाहतोय पानात
टपटप गारा पडतात अंगणात
टपोर्या शुभ्र गारा वेचूया चला रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।२ ।।
बिजलीचा चमचमाट देखणा दिसतो
मयूर तालात पिसारा छान फुलवतो
ढगांचा नाच आपण पाहूया चला रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।३।।
पाऊस रानाला ओलेचिंब करतो
धरणीला हिरवा शालू नेसवतो
सजलेली धरती पाहूया चला रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।४ ।।
पत्र्यावरती टिपरीचा नाद गुंजतो
कौलावरती ताशांचा आवाज होतो
पावसाचा सुरेल नाद ऐकुया चला रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे।।५ ।।
नील आसमंत काळ्या मेघांनी भरला
विजेचा गडगडाट पाहून राम घाबरला
घरात बसून पाऊस पाहूया चला रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।६।।
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
*गडगडाट*
काळया काळया ढगांची
आभाळात झाली दाटी
कडकडा लागले भांडायला
करू लागले दमदाटी .
धमकावले वीजबाईंनी
चमचम मारली छडी
ढोल्या ढोल्या ढगांनी
मारली डोंगरावरून उडी .
वाऱ्याने मारली कोपरखळी
सैरावैरा ढगांच्या झुंडी
धडकले एकमेकावर
गडगडाट !उडाली घाबरगुंडी.
गडगडाट चमचमट
आभाळात एकच गोंगाट
गाई गुरे पशु पक्षी
निवाऱ्याला पळाले सुसाट.
हत्तीच्या सोंडेने पडतो पाऊस
चहुकडे पाणीच पाणी
पावसाचे हे रौद्ररूप
कुठे वरदान कुठे शापावाणी.
*सौ विमल धर्माधिकारी. वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
*गडगडाट*
काळे काळे ढग
जमा झाले एकत्र
भांडू लागले सगळे
असता सोबती मित्र
ढगांना आला राग
सुरू झाला गडगडाट
उडाली माझी घाबरगुंडी
ऐकता विजांचा कडकडाट
सोसाट्याचा सुटला वारा
धूम ठोकू आवाज आला
बरसल्या पाऊस गारा
निवारा शोधा चला
ऐकता ढगांचा गडगडाट
मनी आमची घाबरली
घेता जवळ तिला
अलगद मला बिलागली
*अश्विनी आनंदराव जगदाळे*
*ता.केज जि. बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🌈🌨️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



