
0
5
1
6
5
6
नागमोडी अक्षरे
सरळ सरळ चालून
अक्षर आता थकले
विश्रांतीसाठी अक्षर
मागे- पुढे झुकले
वेलांटीने टोपी तीची
केली उंचच…..उंच
उकाराच्या पैजनाने
ओलांडला रेखामंच
कानाने पसरले
लांबच लांब पाय
मात्राला अडवायची
कोणाची मजाल हाय?
नागासारखी सर्वच
झाली वेडी- वाकडी
मापलेली जागाही
पडू लागली तोकडी
शिर्षकातच त्यांना
मिळू लागला मान
नागमोडी अक्षरे
मिरवू लागले शान
वनिता गभणे
आसगाव भंडारा
0
5
1
6
5
6



